
मंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील कोराना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 16 जानेवारीचा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचा आदेश रद्द करून निवडणुका घेण्याच्या नव्या आदेशामुळे "दामाजी'सह 135 सहकारी संस्थांच्या निवडणुका ऐन उन्हाळ्यात लागणार आहेत. त्यामुळे या होणाऱ्या निवडणुकात "दामाजी'ची निवडणूक मात्र सगळ्यांनाच घाम फोडणारी ठरणार आहे.
राज्यातील सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 कक मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोव्हिड - 19 मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता 18 मार्च, 17 जून ,28 सप्टेंबर 2020 च्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका व ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहता, राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले आहेत. याबाबत 16 जानेवारी 2021 चा आदेश रद्द करून शासनाच्या कोव्हिड - 19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
तालुक्यामध्ये "अ' वर्गामध्ये मोजक्याच संस्था आहेत. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये दामाजी कारखान्याची निवडणूक तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची मानली जात आहे. संचालक होण्यासाठी तालुक्यामधून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे ही निवडणूक मतदारसंघाचा आमदार ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. "दामाजी'चा आशीर्वाद मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांना ही निवडणूक महत्त्वाची आहे. याशिवाय सध्या "ब' वर्गामध्ये 58, "क' वर्गामध्ये 25, "ड' वर्गामध्ये 51 अशा 134 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी तालुक्यामध्ये सुरू होणार आहे.
शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. निवडणुकीसंदर्भातील आदेशामुळे तालुक्यामधील ब, क, ड या वर्गातील एकूण 134 संस्था असून त्याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली आहे.
- प्रमोद दुरगुडे,
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.