सोलापुरातील खासगी रुग्णालयांचा अहवाल महापालिकेस सादर

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 21 मे 2020

इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. हरीश रायचूर यांनी महापालिका आयुक्तांना शहरातील रुग्णालये, प्रयोगशाळा (लॅब), वैयक्तीक प्रॅक्टीस करणारे डॅाक्टर, वयोमानानुसार रुग्णालयात येऊन काम करणे शक्य नसलेले डॅाक्टर यांची सविस्तर माहिती दिली आहे. 

सोलापूर ः शहरातील खासगी रुग्णालये सुरु असून, त्याची सविस्तर माहिती असलेले पत्र इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. हरीश रायचूर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या पत्रात सुरु असलेली रुग्णालये, प्रयोगशाळांची माहिती तसेच बंद असलेली रुग्णालये, त्यामागची कारणे याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेने शहरातील तब्बल 28 रुग्णालये, प्रसुतीगृहांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यावरून शहरातील डॅाक्टरांनी महापालिकेच्या कारभाराविरुद्ध मोठा संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पुन्हा काल जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॅाक्टरांची बैठक झाली आणि खासगी रुग्णालये सुरु करण्याचा निर्णय झाला. त्यानुसारची यादी डाॅ. रायचूर यांनी महापालिका आयुक्तांना दिली आहे. 

डाॅ. रायचूर यांनी दिलेल्या पत्रानुसार शहरातील काही रुग्णालये आणि त्यांची सद्यस्थिती याप्रमाणे ः प्रिझम मेडीकल डायग्नोस्टिक (सुरु), डाॅ. वोरा क्लिनीक (कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने ओपीडी बंद), डॅा. वोरा पॅथाॅलाॅजी लॅब (सुरु), वेलनेस नर्सिंग होम (सुरु), अंबरकर आय क्लिनीक (सुरु), कर्वेकर हॅास्पिटल (सुरु), मिथांशू (ओपीडी सुरु, आयपीडी सुरु करीत आहेत), सन स्किन (सुरु), तडवळकर हॅास्पिटल (सुरु),  हाफिजी क्लिनीक (कंटेंटमेंट झोनमध्ये असल्याने बंद), सोमाणी हार्ट केअर (सुरु), सचिन कुलकर्णी आर्थोपिडीक (सुरु), नेने क्लिनीक (सुरु), मुक्ता नर्सिंग होम (सुरु), राठी हॅास्पिटल (सुरु), डॅा. शीतल गांधी (सुरु), निदान पॅथॅालाॅजी (सुरु), कुमठेकर क्लिनीक (सुरु, वेळ घेऊन तपासणी), इनामदार क्लिनिक (रोज तीन तास ओपोडी सुरु), डॅा. चिडगुपकर हॅास्पिटल व संशोधन केंद्र (सुरु), मुक्ता नर्सिंग होम (सुरु), अॅपेक्स (सुरु), कस्तुरी नर्सिंग होम (सुरु), डायबेटीक फूट केअर (सुरु), बिनीत (सुरु), ईलाईट (सुरु), डायबेटिस केअर सेंटर (सुरु), भंडारी हॅास्पिटल (सुरु), मीरा हॅास्पिटल (सुरु), खैरनार हॅास्पिटल (आपत्कालीन स्थितीत मोबाईल संपर्क करून शक्य असल्यास), मनोविश्व क्लिनीक (वेळ घेऊन फक्त), विठाई क्लिीनक (सुरु), अंकुगुर्रम (सुरु), चितळे क्लिनीक (सुरु), विजय क्लिनीक (सुरु), बलदवा हॅास्पिटल (सुरु), अग्रवाल नर्सिंग होम (सुरु), हार्मोनि क्लिनीक (सुरु), साफल्य क्लिनीक (सुरु), प्रगती लॅब (सुरु), राहूल नर्सिंग होम (ओपीडी,आयपीडी बंद, कंटेनमेंट झोन परिसर), नंदिनी किडनी केअर (सुरु), निधी जॅाईंट केअर (सुरु), स्पंदन (सुरु), निर्मला नर्सिंग होम (सुरु), डॅा. जोशीज किडनी केअर (सुरु), विनायक नर्सिंग होम (सुरु), बिराजदार हॅास्पिटल (सुरु), जोग नेत्र रुग्णालय (फक्त अत्यावश्यक रुग्णांसाठी, व्हिडीअो कॅान्फरन्सद्वारे मार्गदर्शन), तुंबळ हॅास्टिपल (सुरु, वेळापत्रकानुसार), अपर्णा हॅास्पिटल (सुरु), देवयानी नर्सिंग होम (सुरु), राऊत अॅक्सिडेंट (वेळापत्रकानुसार), वरद क्लिनिक (सुरु), सिद्धगंगा हॅास्पिटल (सुरु), रघोजी इएनटी व मॅटर्निटी (सुरु), श्रीनिवास क्लिनीक (सुरु), उपासे हॅास्पिटल (सुरु), शाहू हाॅस्पिटल (सुरु), सिद्धेश्वर बहुउपचार रुग्णालय (सुरु), सोलापूर केअर (सुरु), श्री आय हॅास्पिटल (सुरु), काडादी हॅास्पिटल (सुरु), जोशी हॅास्पिटल (सुरु). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private hospitals in Solapur started, list submitted to Municipal Corporation