
सध्या गतिरोधकमुळे अपघात वाढत आहेत. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या समोर कायमस्वरूपी गतिरोधकची गरज नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित गतिरोधक उपयोगाचे असल्याने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
इंधन, प्रदूषण वाचविण्यासाठी स्वयंचलित गतिरोधक
सोलापूर : जिल्ह्यात व शहरात अनेक शाळा व महाविद्यालये रस्त्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे शाळेसमोरून जाताना वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, शाळांना सुटी असताना गतिरोधकाचा उपयोग होत नाही. यासाठी हरिभाई देवकरण प्रशालेतील केदार कामतकर याने स्वयंचलित गतिरोधक हा प्रकल्प बनवला आहे. या प्रकल्पाची दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
सध्या गतिरोधकमुळे अपघात वाढत आहेत. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या समोर कायमस्वरूपी गतिरोधकची गरज नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित गतिरोधक उपयोगाचे असल्याने हे उपकरण तयार करण्यात आले आहे. तसेच सध्या अवयवदान प्रक्रिया चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करावे लागते. या वेळी सुद्धा स्वयंचलित गतिरोधकचा उपयोग होतो. या उपकरणामध्ये वाहने सिग्नला उभारल्यावर प्रदूषण कमी व्हावे व झालेले प्रदूषण कमी करण्यासाठी चौकात एक कमान तयार करण्यात आली आहे. या कमानीमध्ये एक उपकरण बसविले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून वाहनांमधून बाहेर पडणारे कार्बन शोषून घेतले जाते. या कार्बनवर प्रक्रिया करून ड्रेनेजमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्याच्या गतिरोधकाचे तोटे
- वाहनांची गती कमी होते
- इंधनाचे मोठ्या प्रमाणावर ज्वलन होते
- वाहनांचा वेग कमी जास्त केल्याने मोठ्या प्रमाणवर कार्बन बाहेर पडते
स्वयंचलित गतिरोधकाचे फायदे
- शाळा व महाविद्यालय बंद असताना वाहनांची
- गती कमी करावी लागणार नाही
- इंधनाचे जास्त ज्वलन होणार नाही
- हवेचे प्रदूषण कमी होईल
Web Title: Project Automatic Speedbreaker Save Fuel And Pollution
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..