अतिवृष्टी, महापुरातील नुकसानीच्या भरपाईसाठी 482 कोटी रुपयांचा प्रस्ताव 

solapur Mahapur
solapur Mahapur

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे तीन लाख 13 हजार 810 हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत तीन लाख 95 हजार 19 शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 482 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 16 हजार 777 हेक्‍टर, बार्शी तालुक्‍यात 62 हजार 286 हेक्‍टर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 21 हजार 64 हेक्‍टर, अक्कलकोट तालुक्‍यात 42 हजार 179, माढा तालुक्‍यात 36 हजार 538 हेक्‍टर, करमाळा तालुक्‍यातील 17 हजार 310 हेक्‍टर, पंढरपूर तालुक्‍यातील 47 हजार हेक्‍टर, मोहोळ तालुक्‍यात 22 हजार 160 हेक्‍टर, मंगळवेढा तालुक्‍यातील 25 हजार 739 हेक्‍टर, सांगोला तालुक्‍यातील 9 हजार 832 हेक्‍टर आणि माळशिरस तालुक्‍यात 12 हजार 923 हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. 


आकडे बोलतात... 

  • पिक निहाय बाधित क्षेत्र हेक्‍टरमध्ये 
  • सोयाबीन : 48525 
  • तूर : 59848 
  • ऊस : 54705 
  • मका : 34768 
  • डाळिंब : 38539 
  • द्राक्षे : 16240 
  • केळी : 5522 

एनडीआरएफच्या मदतीकडेही लक्ष 
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार 482 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला आहे. राज्यशासनाच्या या मदती व्यतिरिक्त केंद्र सरकारने एनडीआरएफमधून त्यांच्या निकषाप्रमाणे अनुदान दिल्यास 335 कोटी रुपये अतिरिक्त हे सोलापूर जिल्ह्याला मिळू शकतील. केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार? यावर या मदतीचे भवितव्य अवलंबून आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com