
बार्शी (सोलापूर) : सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, कुर्डुवाडी या रस्त्याने सायंकाळी सातनंतर बार्शीकडे वाहनातून प्रवास करीत येत असताना आग लागल्याचे, वणवा पेटल्याचे चित्र दिसत आहे. पण ही आग डोंगर माथ्यावरील, बांधावरील गवताची असते. शेतकरी बंधूंनो, गवत पेटवून देऊ नका, निर्सगाचा ऱ्हास होत आहे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ मधुकर डोईफोडे यांनी "सकाळ'शी बोलताना समाजबांधवांना दिला आहे.
डोईफोडे बोलताना म्हणाले, मनसंधारण, मृदसंधारण, जलसंधारण असे पाणी फाउंडेशनचे धोरण आहे. 80 टक्के ड्रीप इरिगेशन झाले तर तालुक्याला कधीच पाणी कमी पडणार नाही. पण माळरान, बांध, डोंगर माथ्यावरील गवत नष्ट केल्याने आपलेच नुकसान होत आहे. गवत पेटवल्याने माती उघडी होते. उन्हामुळे माती तापते, सैल होते आणि वाऱ्याबरोबर जीवनसत्त्वे उडून जातात. जमिनीची पोषकता नष्ट होते. त्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. वाढवायचा असेल तर गवत हा मोठा उपाय आहे.
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने गवत मोठ्या प्रमाणात आले असून, सुमारे एक ते दीड फूट उंच आहे. निसर्गाचे हे देणं आहे, जपले पाहिजे. गवत असेच ठेवले तर मातीची पोषकता वाढते. पाऊस पडला तरी निवळसंग पाणी येते. उलट जाळले तर पाणी खडूळ येते अन् जमिनीचा एक थर वाहून जातो. गवतामध्ये लपलेले पक्षी, प्राणी यांची शिकार करण्यासाठी काहीजण गवत पेटवून देतात अन् रात्रभर आग धुमसत राहते. प्राणी सैरावैरा धावतात पण ही आपली संपत्ती आहे. त्यांच्यामुळे मातीची पोषकता वाढते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
गवतामुळे मातीमध्ये ओलावा टिकून राहतो. गवताच्या मुळीतून पाणी जमिनीत जाऊन पाण्याची पातळी वाढते. जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. जीवजंतू जिवंत राहतात. गवत हा ससे, पशू, पक्षी यांचा निवारा असून तो टिकला पाहिजे. यासाठी बांधवांनो, गवत पेटवून देऊ नका, असा सल्ला डोईफोडे यांनी दिला आहे.
शेतातील पालापाचोळा कधीच जाळू नये. शासनाकडून दरवर्षी 12 हजार रुपये अनुदान नाडेप हौदासाठी मिळते. त्यात पाला-पाचोळा टाकला, गांडूळ खत बॉक्स टाकले की दोन ट्रॉली खत तयार होते. माती बंधारे, सिमेंट बंधारे अतिवृष्टीने थोडे तुटले असतील तर शासनाच्या मदतीची वाट पाहू नका. दुरुस्त करून घ्या, अन्यथा लाखो लिटर पाणी वाया जाते.
- मधुकर डोईफोडे,
पर्यावरण तज्ज्ञ, बार्शी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.