esakal | आता रेल्वेत असं घ्या मोफत शुद्ध पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pure water will be available on the railway

सोलापुरातून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी हुतात्मा एक्‍स्प्रेस आणि इंद्रायणी एक्‍स्प्रेस या रेल्वे गाड्यांना नागरिकांची पसंती असते. त्यामुळे या गाड्यांना कायम गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेत विक्रेते प्रवाशांची लूट करतात. अनेक विक्रेते 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना देतात.

आता रेल्वेत असं घ्या मोफत शुद्ध पाणी

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पाण्यासाठी होणारी लूट लवकरच थांबणार आहे. इंद्रायणी व हुतात्मा एक्‍स्प्रेसमध्ये प्रत्येक डब्यात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवण्यात येत आहे. काही डब्यांत ही यंत्रणा बसवण्यात आली असून यंत्रणा सुरू झाल्यानंतर शुद्ध पाणी मिळणार आहे. 
सोलापुरातून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी हुतात्मा एक्‍स्प्रेस आणि इंद्रायणी एक्‍स्प्रेस या रेल्वे गाड्यांना नागरिकांची पसंती असते. त्यामुळे या गाड्यांना कायम गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेत विक्रेते प्रवाशांची लूट करतात. अनेक विक्रेते 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना देतात. रेल्वे स्थानकावर जादा दराने पाणी बाटली विकली तर कारवाई केली जाते. मात्र, मध्येच काही विक्रेते गाडीत जाऊन जादा दराने पाणी बाटली विकतात. यातून अनेकदा विक्रेते आणि प्रवासी यांच्यात वाद होते. रेल्वेतील शुद्ध पाण्याची यंत्रणा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना गाडीतच शुद्ध पाणी मिळणार आहे. 

हेही वाचा- सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दणका
कशी आहे यंत्रणा
 
सोलापुरातून सुटणारी इंद्रायणी आणि हुतात्मा या दोन्ही गाड्यांत एलएचबी रेक आहेत. यात स्वच्छतागृह व दरवाजाच्या बाजूला शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात शुद्ध पाणी येणार आहे. अजून ही यंत्रणा सुरू झाली नसून काही डब्यांत यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. 

असे मिळणार पाणी 
शुद्ध पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या यंत्रणेवर पिवळे, लाल, हिरवे बटण आहे. त्याखाली आणखी एक हिरवे बटण आहे. त्यात नळ असून पाणी बाटली ठेवण्यासाठी जागा आहे. त्यात अतिरिक्‍त पाण्याचा निचरा होणार आहे. पाणी भरण्यासाठी बाटली स्टॅंडवर ठेवून हिरव्या रंगाचे बटण दाबल्यानंतर पाणी येईल. लाल रंगाचे बटण सुरू (ऑन) असेल तर यंत्रणेची स्वच्छता सुरू असणार आहे. तेव्हा हिरवे बटण दाबू नये अशी सूचना त्यावर करण्यात आली आहे. याशिवाय पिवळे बटण सुरू नसेल तर कोच सहायकाला सांगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

go to top