अर्रार्र ! पोलिसांनाच पडला हद्दीचा प्रश्‍न; जुगारावरील कारवाईदरम्यान इमारतीवरुन उडी मारल्याने एकाचा मृत्यू 

1Crime_6_98 - Copy.jpg
1Crime_6_98 - Copy.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील अशोक चौक परिसरातील पोशम्मा मंदिराजवळील एका तीन मजली इमारतीत मटका बुकिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी पोहचताच कारवाईच्या भितीने पळून जाण्याच्या प्रयत्नातील एकाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र, त्यामध्ये त्याला जीव गमवावा लागला आहे. परवेज नुरुद्दीन इनामदार (वय 42) असे त्या मृताचे नाव आहे. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर काहीवेळ जेलरोड आणि सदर बझार पोलिसांमधील हद्दीचा प्रश्‍न सुटला नव्हता.

न्यू पाच्छा पेठेतील कोंचीकोरवे गल्लीतील दुमजली इमारतीत सुरु असलेल्या मटका जुगार कंपनीत चिठ्ठ्या संकलित करण्याचे काम परवेझ करीत होता. याची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील काहींनी पळ काढला, तर परवेझला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच तो पोलिसांच्या तावडीतून निसटला आणि त्याने इमारतीवरुन उडी मारली. दरम्यान, मटका बुकीवर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलीसांकडून किरकोळ मारहाण करण्यात आली आणि ते सहन न झाल्यानेच परवेझ याने इमारतीवरून उडी मारल्याची चर्चा होती. जेलरोड पोलिसांनी या प्रकरणात 20 ते 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी, घटनेनंतर पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांच्यासह सहायक पोलिस आयुक्‍तांनीही त्याठिकाणी भेट दिली.

पोलिस ठाण्याच्या हद्दीचा घोळ 
मटका बुकीवर कारवाई करताना इमारतीवरुन पडलेला परवेझ गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठ हा परिसर जेलरोड आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे घटनास्थळी नेमके कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे हे न समजल्याने गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेलरोड आणि सदर बझार पोलीसांना कळवले. त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल आणि त्यांचे कर्मचारी, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे हेही घटनास्थळी दाखल झाले. हे ठिकाण जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com