
लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याने प्रतीदिन सहा हजार टन ऊस गाळपाचे नियोजन केले असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करून, असेही राजन पाटील यांनी केले.
अनगर (सोलापूर) : केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत येत असून मागील राज्य सरकारकडे मागणी केलेली आठ कोटी रुपये येणे असून त्यामुळे कारखान्यास व ऊस उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील एकमेव व प्रथम गाळप परवाना मिळालेल्या लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या 17 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज सकाळी आमदार यशवंत माने यांच्या हस्ते व माजी आमदार राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत गव्हाणीत पहिली मोळी टाकून करण्यात आला. त्या प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी पौरोहित्य बाजीराव जोशी यांनी केले. अध्यक्षस्थानी भिमा साखर कारखान्याचे माजी संचालक नाना डोंगरे होते. कोरोनाच्या काळात सर्व उपस्थित मास्क लावून, सामाजिक अंतर राखून होते. याप्रसंगी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, सभापती रत्नमाला पोतदार, प्रकाश चवरे, रामचंद्र क्षिरसागर, मदन पाटील, देवानंद गुंड, ऍड. राजाभाऊ गुंड, जालिंदर लांडे, ज्ञानेश्वर चव्हाण, हणमंत पोटरे, अस्लम चौधरी, दीपक माळी, सज्जन पाटील, शिवाजी सोनवणे, संदीप पवार, शुक्राचार्य हावळे, संभाजी चव्हाण, अशोक चव्हाण, अनिल कादे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत येत असून मागील राज्य सरकारकडे मागणी केलेली आठ कोटी रुपये येणे असून त्यामुळे कारखान्यास व ऊस उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. या वर्षी केंद्र सरकारने एफआरपी वाढविली. परंतू एसएमपी वाढवली नसल्यानेही कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. दरवर्षी साखर कारखान्याना नव-नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत असून कारखाना काढणे सोपे आहे. पण चालविणे अवघड झाले आहे. कर्ज प्रकरणी बॅंकांवर निर्बंध आणून शेतकऱ्यांशी निगडीत संस्थांना अल्पदरात सहाय्य केल्यास साखर कारखानदारी चांगली चालून पर्यायाने शेतकऱ्यांची प्रगती होईल.
याप्रसंगी आमदार यशवंत माने, शिवाजी सोनवणे, देवानंद गुंड, अस्लम चौधरी, दीपक माळी, नाना डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन केले.
संपादन : वैभव गाढवे