esakal | प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी रासेयो भारतीय राजश्री माने हिची निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Rajashri Mane

हैदराबाद येथे महाराष्ट्रासह, गोवा, दमणी - दीव, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगण या सहा राज्यातील 200 निवडक विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण करीत महाराष्ट्रातील 14 विद्यार्थ्यांची दिल्ली येथील पथ संचलनाकरिता निवड झाली. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आणि अकलूज येथील रहिवासी राजश्री लक्ष्मणराव माने हिचा देखील या संघात समावेश आहे. 

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी रासेयो भारतीय राजश्री माने हिची निवड 

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : प्रजासत्ताक दिनी राजपथ (दिल्ली) येथे होणाऱ्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात अकलूजच्या राजश्री माने हिची निवड करण्यात आली आहे. या यशामुळे राजश्री माने हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

हैदराबाद येथे पश्‍चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलनाचे दहा दिवसीय शिबिर 20 ते 29 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातून 28 मुले आणि 28 मुली अशा एकूण 56 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. हैदराबाद येथे महाराष्ट्रासह, गोवा, दमणी - दीव, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगण या सहा राज्यातील 200 निवडक विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण करीत महाराष्ट्रातील 14 विद्यार्थ्यांची दिल्ली येथील पथ संचलनाकरिता निवड झाली. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आणि अकलूज येथील रहिवासी राजश्री लक्ष्मणराव माने हिचा देखील या संघात समावेश आहे. 

राजश्री आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय तिची आई शीलादेवी माने यांना देते. कोव्हिड - 19 च्या काळात आवश्‍यक ती दक्षता घेत आपण हे यश मिळविल्याचे ती सांगते. आता राजपथावर संपूर्ण भारताचे संघनायक होणे हे तिचे स्वप्न आहे. 

या तिच्या यशाकरिता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्रीय संचालक श्री. कार्तिकेय, राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य अतुल साळुंखे, तसेच अजय शिंदे, पुणे विद्यापीठ रा. से. यो. संचालक डॉ. प्रभाकर देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वामीराज भिसे, प्राध्यापक शालिनी घुमारे आणि प्राध्यापक पवन नाईक तसेच डॉ. रा. बिचकर, महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दीपक सोनावणे आणि प्राध्यापक उमेश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल