Video : कोरोनाचे कसले सावट! येथे जोरातंय तरुणाईची रंगपंचमी

अशोक मुरुमकर 
Friday, 13 March 2020

सोलापूर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हारसने महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. पुण्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द होत आहेत. त्याचाच परिणाम रंगपंचमीवरही काही प्रमाणात जाणवत आहे. मात्र, याला न घाबरता सोलापुरात विविध ठिकाणावरुन शिक्षणासाठी आलेल्या तरुणाईने जल्लोषात रंगपंचमी साजर केली. कोरोनाला घाबराचे नाही, फक्त काळजी घ्यायची असे आवाहनच त्यांनी केले आहे. 

कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळल्यापासून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेतही जाणवत आहे. रंगपंचमीनिमित्त खरेदी केल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या व रंग घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, याला न घाबरता योग्य ती काळजी घेत सोलापुरात शिक्षणसाठी आलेल्या तरुणाईने जल्लोषात रंगपंचमी साजरा केली. 

तरुणाई म्हणतेय... 
सोनाली कांबळे म्हणाली, मुंबई आणि पुण्यात कोराना व्हायरस आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे. सोलापुरातही सध्या त्याचीच चर्चा आहे. मात्र, त्याला काय घाबरण्याचे कारण नाही. त्याबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आकंक्षा उमरजकर म्हणाली, कोरोनाचा आमच्या रंगपंचमीवर काहीच परिणाम झालेला नाही. तो पसरु नये म्हणून योग्य ती काळजी घेतली तर त्याला घाबरण्याचे कारण नाही. आम्ही तीच काळजी घेऊन रंगपंचमी साजरा करत आहोत. सिद्धारुढ आमले म्हणाला, आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षणासाठी आलेलो आहोत. सोलापुरात कोरोना येणार नाही, काळजी घेतली तर तो बसरणारही नाही. त्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत. आणि वर्षातून एखदा येणार उत्सवही साजरा करत आहोत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rangpanchami celebrates in Solapur young