Marhan
Marhan

बापरे..! कोरोनाबाबत "येथे' जनजागृती करणाऱ्या दोघा बंधूंना लोखंडी रॉड, दगडाने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल 

Published on

बार्शी (सोलापूर) : रस्तापूर (ता. बार्शी) येथे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत गावातील हनुमान मंदिराच्या ओट्यावर सुरू असलेल्या बैठकीतच लोखंडी रॉडने, दगडाने दोघांना मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेत तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जखमींवर बार्शीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप मोहिते, किरण मोहिते, बिरमल मोहिते (सर्व रा. रस्तापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सचिन बरबडे (वय 36) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 18 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. 

मागील चार महिन्यांपासून सचिन बरबडे हे रस्तापूर येथे हनुमान मंदिरातून सकाळी साडेआठ व रात्री आठ वाजता कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करीत होते. यासंदर्भात हनुमान मंदिराच्या ओट्यावर बैठक बोलावली होती. बैठकीस तंटामुक्ती अध्यक्ष पद्मराज बरबडे, पोलिस पाटील यांचे पती नितीन बरबडे, उपसरपंच अनिता बरबडे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर बरबडे, सोसायटी उपाध्यक्ष दत्तात्रय बरबडे, मनोज पालकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत कोरोना विषाणूविषयी सचिन बरबडे मार्गदर्शन करून खाली बसताच "चार-चार महिने कोठे कोरोना असतो का? उगाच काहीतरी ओरडत जाऊ नकोस' असा सूर निघाला अन्‌ बैठकीत गोंधळ सुरू झाला. 

"गावातील लोक अडाणी आहेत, पुन्हा पुन्हा सांगावे लागते' असे सचिन बरबडे यांनी म्हणताच, तिघांनी उठून लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली; तसेच भाऊ मोहन बरबडे यांनाही मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. बरबडे बंधूंच्या डोक्‍याला व कपाळाला जखमा झाल्या असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा तपास पोलिस हवालदार शेख करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com