अर्रार्र! चिकन दिले नाही म्हणून तलवार अन् कोयत्याने मारहाण

Read all crime news in Solapur in one place
Read all crime news in Solapur in one place
Updated on: 

सोलापूर : रामवाडी परिसरातील व वळसंगकर  हॉस्पिटलच्या मागे जेवण करून थांबलेल्या फिर्यादी व त्यांच्या मित्राला आरोपींनी चिकन मागितले. त्यावेळी चिकन देण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी शुक्रवारी (ता. 15) रामवाडी परिसरातील केंगार यांच्या घराजवळ फिर्यादीस गाठले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी चंद्रकांत बिभीषण जाधव यांच्या डोक्यात तलवारीने तर मांडी, हात व छातीवर कोयत्याने मारहाण केल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलीसांत देण्यात आली आहे.
फिर्यादीकडे चिकनची मागणी करूनही ते मिळाले नसल्याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी (ता. 11) आरोपी व फिर्यादी यांच्यात शिवीगाळ झाली होती. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी आरोपी व फिर्यादी यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्याचवेळी संशयित आरोपी अजय विश्वनाथ जाधव याने फिर्यादीच्या डोक्यात तलवारीने वार केले. तर संशयित आरोपी अनिल नागेश गायकवाड याने फिर्यादी चंद्रकांत जाधव यांच्या मांडीवर, हातावर व छातीवर कोयत्याने वार केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या सकरणी संशयित आरोपी अजय जाधव, अनिल गायकवाड, धीरज जाधव यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे करीत आहेत.

पोलिसांनी 242 जणांना पाठवले वैद्यकीय तपासणीसाठी
सोलापूर : सोलापूर शहरात या विषाणूचा वेखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी कडक केली असून शनिवारी (ता. 16) नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी एक हजार 732 वाहनांची तपासणी केली. त्यापैकी 138 वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तर 242 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले आहे. दुसरीकडे शहरातील प्रतिबंधित परिसरातून विनापरवाना बाहेर जाण्यास बंदी असतानाही कायद्याचे उल्लंघन करून इतर परिसरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 36 जणांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मेडिकल कॉलेजच्या स्टोअर रुममध्ये चोरी
सोलापूर : वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाठीमागील स्टोअर रूममध्ये चोरी झाली आहे. चोरट्याने रूममधील ॲल्युमिनियमचे कोटिंग असलेले पार्टिशनचे साहित्य लंपास केले आहे. मेडिकल कॉलेजच्या पाठीमागील रुमची खिडकीतून चावी घेऊन चोरट्याने खोलीतील ॲल्युमिनियमचे दरवाजा व खिडक्यांचे साहित्य चोरून नेले आहे. या साहित्याची अंदाजे किंमत 45 हजार रुपये इतकी होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शंकर लक्ष्मण गड्डम यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com