Read to day affairs of the criminal world in solapur district
Read to day affairs of the criminal world in solapur district

परप्रांतीयांना जागा देणे भोवले... वाचा, गुन्हेगारी विश्‍वातील दिवसभरातील घडामोडी


सोलापूर/पंढरपूर : विनापरवाना परप्रांतीयांना घर भाड्याने दिल्याप्रकरणी शहरातील घरमालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार परशुराम शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात सोमनाथ अधटराव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. परप्रांतीयांना भाडेकरू म्हणून जागा दिली त्याप्रसंगी घरमालकाने त्याची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, असे अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. त्यांच्या आदेशाचे पालन न करता येथील सोमनाथ शरद अधटराव (वय 38, रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर) यांनी त्यांच्या जागेत परराज्यातील नागरिकांना भाडेकरू म्हणून घेऊन ठेवले आहे. त्यासंबंधीची त्यांनी कोणतीही माहिती पोलिस ठाण्यात दिली नाही. त्यांनी अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आदेशाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

माढा सबजेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न 
माढा : माढा सबजेलमध्ये शनिवारी (ता. 22) पहाटे दरवाजाच्या लोखंडी गजास गळफास लावून संशयित महिला आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माढा पोलिसांत पोलिस हवालदार गंगाधर उघडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता. 22) रात्री माढा सबजेल येथे पहारा देत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास महिला लॉकअप रूममधून महिलांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने श्नी. उघडे रूमकडे गेले. त्यावेळी संशयित आरोपी शीतल काळे (वय 25, रा. साडे, ता. करमाळा) हिने सबजेलमधील महिला लॉकअप रूमच्या दरवाजाच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याच रूममधील महिला आरोपीने महिलेचा गळफास सोडविला. या महिलेला तातडीने माढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. 

कामती-कुरुल मार्गावर कंटेनरला आग 
मोहोळ : विजयपूर महामार्गावर कामती ते कुरुल रस्त्यावर विजयपूरकडे मर्क्‍युरियो पालीया या कंपनीच्या प्रवासी बॅगा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. या आगीत सर्व बॅगा जळून खाक झाल्या. कंटेनरला आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी तातडीने सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. नाशिकहून चेन्नईकडे जात असलेला कंटेनर (एचआर 55-झेड 8931) या क्रमांकाचा ट्रान्सपोर्ट कार्गो टेलर हा प्रवासी व सुटकेस बॅगा घेऊन जात होता. मोहोळ-विजयपूर मार्गावरील कुरुल हद्दीत या कंटेनरला अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच पोलिसांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. आग आटोक्‍यात आणली, दरम्यान कंटेनर एका बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. याच वेळी पोलिसांनी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले. पाण्याचा जास्तीचा मारा करीत आग आटोक्‍यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

देलवडी शिवारात विद्युत मोटारीची चोरी 
जिंती : देलवडी (ता. करमाळा) शिवारातील शेतकरी बाळासाहेब काशिनाथ बोंद्रे यांच्या विहिरीतील तीन एचपीची पाणबुडी मोटार चोरीला गेली आहे. या घटनेची तक्रार त्यांनी करमाळा पोलिसांत दिली. त्यात त्यांनी म्हटले, माझे गाव कुगाव असून माझी शेती देलवडी हद्दीत आहे. माझ्या विहिरीवरील नवीन पाणबुडी मोटारीची चोरी झाली आहे. अद्याप पोलिस खात्याकडून या घटनेचा तपास झालेला नाही. लवकरात लवकर या घटनेचा तपास करावा, अशी मागणी श्री. बोंद्रे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com