या गावातील शेतकरी कशामुळे चिंतीत वाचा

Read more about why the farmers in this village are Worried
Read more about why the farmers in this village are Worried
Updated on

पानगाव (सोलापूर) : पानगाव (ता. बार्शी) परिसरात रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली. 

सायंकाळी सातपर्यंत पावसाचे कोणतेही वातावरण नव्हते; परंतु पावणेनऊ वाजता सुरू झालेल्या पावसाने ज्वारी पीक शेतात असणाऱ्या व द्राक्षबागायतदारांच्या भुवया उंचावल्या. सुमारे 20 ते 25 मिनिटे कमी अधिक प्रमाणात पावसाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी होती. जिल्ह्यात चालू हंगामातील रब्बी ज्वारीचा विमा घेतला न गेल्यामुळे ज्वारी पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणे गरजेचे आहे. अवकाळीमुळे ज्वारीचे पीक धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अवकाळीमुळे पीकही पदरात नाही व ज्वारी पिकाला विमा संरक्षणही नाही, असे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते. 

ढगाळ वातावरणने शेतकरी चिंताग्रस्त 
नरखेड : नरखेड (ता. मोहोळ) परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रात्री पावसाचे थेंब पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रब्बी हंगामातील फलधारणा झालेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सध्या ऊस तोडणी सुरू असून पावसामुळे ऊस शेताबाहेर ठेवण्याची वेळ आल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. परिणामी ऊस तोडणी लांबणीवर जाणार. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडी पिकांनी फलधारणा झाली असून अवकाळी पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांची सालचंदी वाया जाणार आहे. द्राक्षे, डाळिंब व कांदा पिकांचे अवकाळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com