पावणेतीन तासाला सापडतो नवीन कोरोनाबाधित; सहा तासाला एक रुग्ण होतो कोरोना मुक्त

प्रमोद बोडके
Sunday, 17 May 2020

सोलापूर शहर व जिल्ह्यात १२ एप्रिललला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कोरोनाबाधित आहे हे समजण्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला ३५ दिवस पूर्ण झाले. 35 दिवसांमध्ये सोलापुरातील कोरोना बाधितची संख्या 364 वर पोहोचली आहे. ३५ दिवसातील कोरोनाची वाटचाल पाहिली तर सोलापुरात दर पावणेतीन तासाला नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे समोर आले आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात १२ एप्रिललला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कोरोनाबाधित आहे हे समजण्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला ३५ दिवस पूर्ण झाले. 35 दिवसांमध्ये सोलापुरातील कोरोना बाधितची संख्या 364 वर पोहोचली आहे. ३५ दिवसातील कोरोनाची वाटचाल पाहिली तर सोलापुरात दर पावणेतीन तासाला नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे समोर आले आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या जास्त आहे. तेवढी एकमेव बाब सोलापूरकरांसाठी समाधानाची मानली जात आहे. आतापर्यंत 150 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दर पावणे तीन तासाला कोरोनाचा नवीन रुग्ण सापडत आहे तर सरासरी दर सहा तासाला कोरोनाचा एक रुग्ण कोरोना मुक्त होत असल्याचेही समोर आले आहे. सोलापुरात आतापर्यंत तीन हजार 820 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील तीन हजार 456 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सोलापुरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण तेलंगी पाछा पेठ परिसरात आढळला. या परिसरात सध्या 31 कोरोना बाधित रुग्ण आहेत तर शास्त्रीनगर परिसरातील शानदार चौकात सर्वाधिक 51 कोरोना बाधित रुग्ण आहेत. लष्कर सदरबाजार परिसरात 25, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड परिसरात 16, मोदीखाना परिसरात १०, भारतरत्न इंदिरा नगर परिसरात 19, बापूजी नगर परिसरात 16,  सिद्धेश्वर पेठेत 11, अशोक चौकात 10, साईबाबा चौकात 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 

प्रलंबित रिपोर्ट
प्रलंबित रिपोर्ट 286 अन वाढती धाकधूक सोलापूर शहर व जिल्ह्यातील 37 जण आज कोरोना मुक्त झाले आहेत.अद्यापही 286 जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित आहेत. प्रलंबित रिपोर्टची संख्या जास्त असल्याने सर्वांनाच धाकधूक लागली आहे. आज (रविवारी) व सोमवारी किती कोरोनाबाधित आढळतात? याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. 

मृत्यूची टक्केवारी 6.59
सोलापुरातील पस्तीस दिवसातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या टक्केवारीमध्ये काढल्यास 6.59 टक्के व्यक्तींचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची टक्केवारी 41.21 एवढी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read Pramod Bodke report on the percentage of corona patients in Solapur