ममा...ममा.. म्हणून मुलगा कुशीत येवून मिठी मारु नये म्हणून त्यांना आधी घरी फोन करून सांगावं लागतं

सुस्मिता वडतिले
गुरुवार, 21 मे 2020

सोलापूरच्याच मूळच्या राहणा-या राणी यांचे 24 वय सुरू आहे. त्यांना साडेतीन वर्षाचा एक मुलगा असून त्याचे नाव संभव आहे. संभव एक वर्षाचा असल्यापासून राणी यांनी  काम करण्यास सुरुवात केली

सोलापूर - करोना आल्यानंतर सुरुवातीला भीती वाटली नव्हती. मात्र शहरात साथ पसरायला लागली तेव्हा थोडीशी भीती वाढू लागली. क्वांरटाईन करण्यात आलेले रुग्णांची सेवा करण्याची संधी प्रत्येकांना मिळत नाही. ती संधी मला मिळाली, समाजाचं आपणं काही देणे लागतो. ही भावना मनात ठेवून काम करण्यास सुरुवात केले, याचे समाधान वाटत आहे. कधी कधी मनात येते की काही दिवस सुट्टी घेऊन घरी राहावे, परंतु मध्यंतरी प्रशासनाने नोटीस काढली होती की, कोण रजा घेतील त्यांना घरीच बसावे लागेल, त्यामुळे सुट्टी न घेता रोज ड्युटी करण्यासाठी जात आहे. ही साथ कधी आटोक्यात येईल, माहिती नाही. परंतु आपण पेशंटसाठी आहोत, त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य आहे, म्हणून काम मनापासून करत आहे. परंतु मनात कुठेतरी वाईट याचेही वाटते की, याचा त्रास आपल्या मुलाला संभवला होवू नये, हीच चिंता सतावत आहे सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या पारिचारिका राणी शिरसट यांना. करोनामध्ये सुरू असलेला त्यांचा हा प्रवास त्यांनी सांगितले आहे. 

सोलापूरच्याच मूळच्या राहणा-या राणी यांचे 24 वय सुरू आहे. त्यांना साडेतीन वर्षाचा एक मुलगा असून त्याचे नाव संभव आहे. संभव एक वर्षाचा असल्यापासून राणी यांनी  काम करण्यास सुरुवात केली. गेल्या सात वर्षापासून राणी नर्स म्हणून काम करत आहेत. हॉस्पिटलमध्ये पेशंटला इंजेक्शन देणे, औषध देणे, ड्रेसिंग करणे, सलाईन लावणे ही कामे करतात‌. त्यांची कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू असते. त्यासाठी त्यांनी सकाळी सहा वाजता उठून घरातील सर्व कामे आवरून मुलाला खाऊपिऊ घालून मग ड्युटीला जातात. त्यानंतर सायंकाळी आल्यानंतर शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णांना जेवण वाटण्याचे काम ही करतात.

परंतु सध्याची परिस्थिती पाहता करोनामुळे त्यांच्या कामांमध्ये आणखी थोडे कामाची भर पडली आहे. घरातील कामे आवरून हॉस्पिटलमध्ये जावून पीपीई किटमध्ये फेसकॅप, गाऊन, मास्क, गाॅगल हे सर्व कव्हर करून पेशंटला तपासावे लागते. त्यांना घरी जाण्यास कधी वेळेवर तर कधी उशीर होतो. त्यावेळी मुलगा त्यांची आठवण काढून खूप रडतो. सध्या करोनामुळे राणी यांना रोज दिवसभर काम करून सायंकाळी घरी जायच्या अगोदर फोन करून घरी सांगावे लागते. जेणेकरून मुलगा संभव नेहमीप्रमाणे कामावरून आल्यावर ममा...ममा...असे म्हणत कुशीत येवून मिठी मारु नये. सध्याच्या परिस्थितीत या गोष्टी होवू नये म्हणून राणी यांच्या सासूबाई मुलाला घेऊन बाहेर जातात. त्यानंतरच राणी घरी येतात. घरी आल्या आल्या हात आणि तोंड धुवून घरामध्ये येतात आणि आंघोळ करून त्यानंतरच संभवला जवळ घेऊन बसतात. त्याला थोडा वेळ देऊन त्यानंतर सायंकाळच्या कामास सुरुवात करतात.

आजही नेहमीप्रमाणे सायंकाळी रस्त्यावरील मनोरुग्णांना जेवण तयार करुन वाटण्याचे काम करत आहेत. जगभर करोनाने धुमाकूळ घातला आहे.‌ त्यामुळे अनेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे सगळ्यांच्याच आयुष्यात त्याचा परिणाम झालाय. रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस या कामाच्या बाबतीत नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांना घरातील काम आणि रुग्णांची नेहमीच सेवा करावी लागते. करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहे. परंतु डॉक्टर, पारिचारिका यांना आपली काळजी घेतच रुग्णांची ही काळजी घ्यावी लागत आहे. त्याच पद्धतीने पारिचारिका राणी आपल्या हातून सेवा घडत असल्यामुळे मनापासून काम करत आहेत.

real story of a health worker and what sacrifice health workers are giving amid corona 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: real story of a health worker and what sacrifice health workers are giving amid corona