करमाळा बाजार समितीत उडदाला विक्रमी 8 हजार 401 रूपये दर

अण्णा काळे
Tuesday, 22 September 2020

मंगळवारी बाजारात उडीदाचा दर किमान 5 हजार 700, सरासरी 7 हजार 700 तर कमाल दर 8 हजार 401 रूपये दर मिळाला. तर मंगळवारी दोन हजार क्विंटल आवक होती. ही आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. 

करमाळा (सोलापूर) : गेली महिनाभरापासून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती उडदाची विक्रमी आवक होत होती. त्यामुळे उडीद बाजारात चढउतार होत होते. मात्र मंगळवार (ता. 22) रोजी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती उडदाला विक्रमी 8 हजार 401 रूपये दर मिळाला आहे. 
मंगळवारी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती विक्रीस आलेल्या उदडाचा निलाव सुरू होताच 8 हजार 200 रूपये भाव निघाला. चांगल्या प्रतीच्या उडदाला 8 हजारच्या घरात भाव आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. मागील 15 दिवसाच्या तुलनेत उडदाची आवक कमी झाली आहे. मागील पंधरा दिवसात करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती दररोज उडदाची 10 हजार गोण्या आवक होत होती. त्यामुळे दिवसाआड लिलाव घ्यावे लागत होते. तर दर साडेपाच हजाराच्या घरात होते. मात्र ता. 16 पासून उडदाची आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे दर मात्र वाढतच आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाचे बाजार वाढले आहेत. हे वाढलेले बाजार आता व्यापाऱ्यांनी खाली आणू नयेत, अशी मागणी शेतकरी शहाजी शिंगटे यांनी केली आहे यांनी केली आहे. 
मंगळवारी उडीद लिलावाच्या वेळी बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, संचालक आनंदकुमार ढेरे, आडत व्यापारी कन्हैयालाल देवी, अशोक दोशी, शेतकरी महादेव हुलगे, प्रकाश कोळेकर उपस्थित होते. 
मंगळवारी बाजारात उडीदाचा दर किमान 5 हजार 700, सरासरी 7 हजार 700 तर कमाल दर 8 हजार 401 रूपये दर मिळाला. तर मंगळवारी दोन हजार क्विंटल आवक होती. ही आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. 
आडत व्यापारी मनोज पितळे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात यावर्षी विक्रमी उडदाचे उत्पादन झाले आहे. यापूर्वी बाजार समितीत उडदाची इतकी आवक कधीही झाली नव्हती. उडदाला बाजार देखील चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 
बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर म्हणाले, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने कायमच शेतकऱयांच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न केला आहे .या वर्षी बाजार समितीत विक्रीस येणाऱ्या उडदाला आज विक्रमी आठ 8401 भाव मिळाला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A record price of Rs 8401 was paid to Black gram in Karmala market committee Bazar Samiti