दिलासादायक : पंढरपूर तालुक्‍यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले 

The recovery rate of patients in Pandharpur taluka has increased
The recovery rate of patients in Pandharpur taluka has increased

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल असणारे ग्रामीण व शहरी भागातील 25 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तालुक्‍यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. आजपर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 
तालुक्‍यात एमआयटी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णांलय व जनकल्याण हॉस्पिटल येथे कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 25 जणांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने 10 दिवस पूर्ण उपचार देऊन त्यांना आज घरी सोडण्यात आले. तालुक्‍यातील आजपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 
प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले, कोरोना आजार समूळ संपविण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी स्वच्छता, मास्क, वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपयांची अंमलबजावणी केली पाहिजे. योग्य काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहु शकतो. कोणतेही लक्षणे आढल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. हा आजार उपचाराने पूर्ण बरा होणार आजार आहे. आजाराबाबत कुठलेही गैरसमज बाळगू नयेत. रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी व कोरोनाचा प्रसार थंबविण्यासाठी सर्व आवश्‍यक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहेत. 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्‍यात आयसीएमआरच्या सूचनांनुसार अँटीजन टेस्ट सुरु झाल्या आहेत. अँटीजन टेस्टद्वारे संशयितांच्या तपासण्या केल्या जात असून त्याचा तपासणी अहवाल अर्ध्या तासात उपलब्धत होत आहे. त्यामुळे सुरुवातील काही दिवस बाधितांची संख्या वाढत असताना दिसत आहे. तालुक्‍यात रुग्ण व्यवस्थापनेमुळे वेळेत उपचार उपलब्ध होत असून कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार होत आहेत. 
कोरोनामुक्त झालेल्या 25 जणांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com