"माणुसकीची भिंत" द्वारे दिवाळी भेट गरजुंना देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 29 October 2020

दरवर्षी सदर उपक्रमाचे आयोजन सात रस्ता येथील बस स्टॉप वर आयोजन केले जाते. पण यंदा कोरोनाच्या ह्या संकटामुळे हा उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविणार आहे. कपडे अथवा इतर वस्तू द्यावयाची असल्यास आपल्याला एक गुगल फॉर्म दिला ज्यावर नाव, नंबर व कपड्याचा बॅगचा फोटो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्वंयसेवक घरी येऊन कपडे अथवा इतर वस्तू स्वीकारतील व ते योग्य गरजूंपर्यंत पोहोच केले जाईल अशी माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. 

सोलापूरः दिवाळी आली की हमखास गरजू लोकांची दिवाळी साजरी व्हावी या साठी मदतीचे हात पुढे येतात. अनेकांना ही मदत गरजूपर्यंत वेळेत पोचवायची असते. माणुसकीची फाऊंडेशनच्या वतीने माणुसकीची भिंत या उपक्रमातून ही मदत पोहचवण्याचे काम सातत्याने केले जाते. 

हेही वाचाः आयुर्वेद विद्यार्थी व डॉक्‍टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात ः निमा स्टुंडट फोरमची मागणी 

"नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जावा" या धर्तीवर कार्य करत असणाऱ्या सोलापूरातील माणुसकी फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने दिवाळी च्या तोंडावर गोर, गरीब व गरजूंना जुने अथवा नवे घालणे योग्य कपडे व इतर वस्तू मिळावेत त्याच बरोबर श्रीमंतांच्या घरी अडगळीत पडलेल्या वस्तू योग्य गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत आतापर्यंत लाखो लोकांना कपडे देण्यात आले आहेत. 

हेही वाचाः फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीला नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलेन्स अवार्ड जाहीर 

दरवर्षी सदर उपक्रमाचे आयोजन सात रस्ता येथील बस स्टॉप वर आयोजन केले जाते. पण यंदा कोरोनाच्या ह्या संकटामुळे हा उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविणार आहे. कपडे अथवा इतर वस्तू द्यावयाची असल्यास आपल्याला एक गुगल फॉर्म दिला ज्यावर नाव, नंबर व कपड्याचा बॅगचा फोटो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्वंयसेवक घरी येऊन कपडे अथवा इतर वस्तू स्वीकारतील व ते योग्य गरजूंपर्यंत पोहोच केले जाईल अशी माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अनिकेत चनशेट्टी,पंकज वाघमोडे, मल्लिनाथ शेट्टी,महेश भासगी,सागर बुरबुरे,जयेश रामावत,विक्रांत भोसले,सुजित बिराजदार, गौरीशंकर कराळे, समर्थ उबाळे,उमेश श्रीगारी,प्रेम भोगडे,विघ्नेश माने,कृष्णा थोरात,आकाश मुस्तारे,सायना कोळी,स्वप्नील गुलेड,आदित्य बालगावकर,डोंगरेश चाबुकस्वार,धनंजय मुंडेवाडीकर,प्रतीक भडकुंबे,स्वामीराज बाबर,अमोल गुंड,प्रशांत गाजूल,प्रा.संजीव म्हमाणे,सुरज रघोजी,रोहीत जकापूरे, विवेक नवले, आदी परिश्रम घेत आहेत पुढील गुगल फॉर्म वर ही मदत पोहोचवता येणार आहे. https://forms.gle/qgEpLa5ro89qWp7g7.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Register online to give Diwali gifts to the needy through "Wall of Humanity"