भर उन्हात उभे राहून लसीकरणाची नोंदणी 

lasikaran.jpg
lasikaran.jpg
Updated on

सोलापूर ः लसीकरणाच्या कामाला शहरात वेग आला असताना सर्व्हर बंद पडणे, ऑनलाईन नोंदीनुसार प्रत्यक्षात केंद्रावर रांगा व ज्येष्ठांना उन्हात उभे राहण्याची वेळ असे प्रकार अनुभवाला येत आहेत. 
येथील दाराशा हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण करण्यासाठी येत आहेत. यामध्ये पुर्वी ऑनलाईन नोंदणी करून नागरिक येतात. त्यांना या नोंदणीवर दिलेल्या वेळेचा काहीच उपयोग होत नाही. त्यांना एकाच रांगेत उभे केले जात आहे. हॉस्पिटल मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने एकाच दालनात लस देण्याची सोय केली आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची दालने वेगळी नसल्याने गर्दी होते. तसेच वयोवृध्द नागरिकांना पुरेशी सावली नसल्याने उन्हात उभे राहावे लागत आहे. समोरील भागात मंडप टाकून बसण्याची सोय केली असली तरी रांगा मात्र पलिकडच्या बाजूने उन्हात लागलेल्या होत्या. 
शहरातील काही केंद्रावर ऑनलाईन डेटाची माहिती अपडेट होत नव्हती. तसेच ऑनलाईन मध्ये लसीकरणाची दिलेल्या तारखेला संबंधीत केंद्रावर लसीकरण बंद असल्याचे प्रकार घडले आहेत. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची सोय स्वतंत्रपणे केली तर वेळेत लसीकरण होऊ शकते. तसेच वृध्दांना फार वेळ उन्हामध्ये ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hard Work and Determination Pay Off as Solapur Youth Clears UPSC IFS Exam
ST Corporation Under Fire as Employees’ Allowances and Bills Get Delayed
Ahilyanagar–Tembhurni Highway Accident Turns Deadly; Infant Among Victims, Three Hurt
Solapur Drowning Tragedy: Two Family Members Die in Farm Pond Mishap
Marathi News Esakal
www.esakal.com