esakal | खासदार महास्वामींना 8 एप्रिलपर्यंत दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

mp solapur

न्यायसंस्थेने संपूर्ण पुरावे पाहून दिलेली स्थगिती ही खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांची बाजू किती बळकट आहे हे दर्शवते. एकांगी आणि विरोधी बातम्या मीडियाला पुरवून महास्वामींच्या विरोधात एक खोटे चित्र तयार केले गेले होते. खासदार महास्वामीजींची बाजू खरी होती, आहे आणि राहील. 
- ऍड. संतोष न्हावकर, महास्वामींचे वकील 

खासदार महास्वामींना 8 एप्रिलपर्यंत दिलासा 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने घाई गडबडीत निकाल दिला आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला संधी दिली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निकालच रद्द करावा अशी मागणी सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या वकिलांनी आज उच्च न्यायालयात केली. तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी या युक्तिवादाला आक्षेप घेतला. उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राच्या या निकालाला 8 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. खासदार महास्वामी यांना 8 एप्रिलपर्यंत दिलासा मिळाला आहे. 
हेही वाचा - ग्राहक संख्या : आयडिया नंबरवन, जिओ नंबर दोन 
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातून डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीच्या प्रमाणपत्रावर भाजपतर्फे निवडणूक लढविली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर या दोघांचाही महास्वामींनी या निवडणुकीत दारुण पराभव केला होता. महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आक्षेप घेण्यात आला होता. या आक्षेपावर सुनावणी घेऊन हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला. खासदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचेही आदेश या समितीने दिले होते. या आदेशानुसार सोलापूर न्यायालय व पोलिसात महास्वामींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यावतीने ऍड. प्रसाद ढाकेफाळकर ऍड. संतोष न्हावकर, ऍड. महेश स्वामी, ऍड. अनुप पाटील, ऍड. योगेश कूरे हे काम पहात आहेत. तक्रारदारांच्या बाजूने ऍड. श्रीहरी अणे, ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आज बाजू मांडली.