या तालुक्‍यातील 15 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

 The reports of 15 people from this taluka were negative
The reports of 15 people from this taluka were negative
Updated on

सांगोला : सांगोला तालुक्‍यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 

पाचेगाव खुर्द येथे ता. 14 मे रोजी परजिल्ह्यातुन एक व्यक्ती कुटुंबासहित आली. त्या व्यक्तीस खोकला, धाप लागणे अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्याकारणाने त्यास पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे पाठविण्यात आलेले होते. त्याच्यासोबत एक निकटवर्तीय यांना सोलापूर येथे संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 12 निकटवर्तीयांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेले होते. त्याचबरोबर तालुक्‍यातील घेरडी येथे एका व्यक्तीस कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्यामुळे त्याला मेडशिंगी येथील कोविड केअर सेन्टर येथें ठेवण्यात आलेले होते. आटपाडी तालुक्‍यातील कोरोनाबाधित व्यक्तीसोबत प्रवास केल्यामुळे तालुक्‍यातील अजनाळे येथील एका व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणा मध्ये ठेवण्यात आले होते. सदर सर्व 14 व्यक्तींचे स्वॅब हे ता. 24 मे रोजी घेण्यात आलेले होते. 


कोरोना विषयक चाचणी मध्ये सर्वच सर्व 14 लोक हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. तसेच सोलापूर येथे संस्थात्मक विलीनीकरण केलेल्या व्यक्तीचे स्वॅब सोलापूर येथे घेण्यात आलेले होते. त्याचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. परजिल्ह्यातून व परराज्यातून येणार्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलीनीकरण करण्याबाबत तालुकास्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सर्व पातळीवर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केलेले आहे. 

वाकी घेरडीत आलेल्या एकजणास 
सोलापुरातुन मुंबईला हलविले 

तालुक्‍यातील वाकी (घेरडी) येथे ता. 20 मे रोजी एकजण मुंबई (जोगेश्वरी) येथून आलेला होता. सदर व्यक्तीस ता. 22 मे रोजी ताप, डोकेदुखी, बोलताना घसादुखी, श्वसनास त्रास होत असल्यामुळे शनिवारी (ता. 23) सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेले होते. सदर व्यक्तीस कौटुंबिक अडचणीमुळे त्याच्या नातेवाईकांनी आवश्‍यक त्या पूर्वपरवानगीसह पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना घरात विलगीकरण करण्यात आलेले आहे, तर एक व्यक्ती वाकी घेरडी येथील शाळेत संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीकडे प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com