
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सर्व शहरवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सोलापूर : सातव्या वेतन आयोगासाठी पात्र असलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची यादी (आकृतिबंध) तयार करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, माझ्या कारकिर्दीत महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही महापौर श्रीकांचना यननम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिली. तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण आणि इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर दिवस - रात्र सामने भरवले जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सर्व शहरवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, आयुक्त पी. शिवशंकर, परिवहन सभापती जय साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खरादी, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अविनाश बोमड्याल, नगरसेविका श्रीदेवी फुलरे, नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका निर्मला तांबे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे आदी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल