साहेब, आता तरी करून खाऊ द्या !  सोलापूरमधील विक्रेत्यांच्या आर्जवापुढे नमले प्रशासन; बुधवार बाजार झाला सुरू 

Budhvar Bajar.jpeg
Budhvar Bajar.jpeg

दक्षिण सोलापूर ः "लाकडाऊननं आमचं लय वाटूळं झालंय बगा. सात महिन्यापसनं घरातच हाव. आज कुठं बाजार सुरू झालाय तर तुमी इवून उटीवताव. साहेब, आता तर करून खाऊ द्या' विक्रेत्यांच्या या आर्जवामुळे महापालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले अन्‌ सात महिन्यानंतर आज (ता.21) बुधवार बाजार सुरू झाला. 
जिल्ह्यातील गावोगावचे बाजार सुरू झाल्याने शहरातील मंगळवार व बुधवार बाजारही सुरू झाले असे समजून विक्रेत्यांसह ग्राहकांनी या दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून शहरात मंगळवार व बुधवार असे मुख्य दोन आठवडी बाजार भरतात. या दोन्ही बाजारात शहरातील तसेच परिसरातील गावोगावचे शेतकरी व व्यापारी तंबूवजा किंवा उघड्यावरील दुकानातून दिवसभर व्यवहार करतात. मंगळवार बाजारात ग्रामीण भागातील तर बुधवार बाजारात शहरातील विक्रेते व ग्राहकांची मोठी गर्दी असते. देशात कोरोना महामारीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने गेल्या सात महिन्यापासून हे दोन्ही बाजार बंदच होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाना जिल्ह्यातील गावोगावचे बाजार आता सुरू झाले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील बाजार सुरू होणे अपेक्षित होते. परंतू महापालिका प्रशासनाने बाजार सुरू करणेबाबत आदेशच काढले नसल्याने संभ्रम आहे. परंतू जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विक्रेत्यांसह ग्राहकांनी शहरातीलही आठवडी बाजार सुरू झाले असे समजून बाजारात गर्दी केली होती. काल (ता.20) मंगळवार बाजारही काही प्रमाणात भरला होता तर आज (ता.21) बुधवार बाजारही सुरू झाला. नेहमीप्रमाणे ग्राहकांची मोठी गर्दी नसली तरी दुकानांची गर्दी मात्र होती. आठवडी बाजारात अनेक नित्योपयोगीसह गृहोपयोगी वस्तू अत्यंच माफक दरात मिळत असल्याने या बाजारातील खरेदीला ग्राहकांची विशेष पसंती असते. याशिवाय येथे थेट शेतकऱ्यांकडून भाजी, धान्य, कडधान्य यांची खरेदीही करता येते. 

या बाजारात किराणा, भुसार यासह कपडे व विविध उपकरणांचीही खरेदी करता येत असल्याने सर्व स्तरातील ग्राहक या बाजारात असतात. त्यामुळे आठवडी बाजार सुरू असले पाहिजेत अशी ग्राहकांची मागणी आहे. महापालिका हद्दीतील बाजार सुरू होण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी नसल्याने आज बाजार भरल्यानंतर तो बंद करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी येथे आले होते. परंतू विक्रेत्यांनी बाजार बंद करण्यास विरोध केला व सात महिन्यापासून आमचा व्यवसाय बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनास नमते घ्यावे लागले अन्‌ बाजार भरला. बाजारात नेहमीप्रमाणे गर्दी नसली तरी बाजार सुरू झाल्याने विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला. 

दुकानदार प्रथमेश सानम यांनी सांगितले की, या बाजार परिसरात माझे कायमस्वरूपी गीफ्ट शॉप आहे. आज बाजार सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आठवडी बाजार सुरू झाला पाहिजे. तो आज सुरू झाल्याने बरे वाटले. 

ड्रायफ्रूट व मसल्याचे व्यापारी समद कल्याणी यांनी सांगितले की, आज बाजार थोड्या प्रमाणात सुरू झाला असला तरी अनेकांना तो सुरू झाल्याचे माहितीच नाही. त्यामुळे आज ग्राहकांची गर्दी नाही. मात्र पुढील बुधवारपासून गर्दी वाढेल असी आशा आहे. लॉकडाऊनने आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने लवकर अनलॉक करणे गरजेचे होते. . 

साबण विक्रेता सर्फराज जकलेर यांनी सांगिले की, गेल्या अनेक वर्षापासून या बाजारात साबाडण, वॉशिंग पावडर यासह अन्य गृहोपयोगी वस्तूंची विक्री करतो. गेल्या सात महिन्यापासून घरातच होतो. आज बाजार सुरू झाल्याने आता कमाई सुरू झाल्याने समाधान वाटले. लोकांना हा बाजार सुरू झाल्याचे माहीत नसल्याने गर्दी कमी आहे. .. 

आडत भुसार व्यापारी प्रशांत पिंपरे यांनी सांगितले की, माझा मंगळवार व बुधवार बाजारात भुसार मालाच्या खरेदी व विक्रिचा व्यवसाय आहे. गहू, ज्वारी, यासह सर्व कडधान्ये खरेदी व विक्री करतो. या दोन्ही आठवडी बाजारामुळे चांगला व्यवसाय होतो तो सात महिने बंद असल्याने नुकसान झाले. आज काही प्रमाणात सुरू झाल्याने बरे वाटले. येत्या काही काळात बाजारातील गर्दी वाढेल व व्यवसाय चांगला होईल हिच आशा आहे. 

कडधान्य व्यापारी भावना शेळके यांनी सांगितले की, शहराच्या आठवडी बाजारात कडधान्यांच्या विक्रिचा व्यवसाय आहे. गेल्या सात महिन्यापासून बाजार बंद असल्याने खूपच कठीण परिस्थिती होती. कमाई नसल्याने घर चालवणेही मुश्‍किल झाले होते. आज बाजार सुरू झाल्याने आता संसाराला हाचतभार लागेल असी आशा आहे. 

महापालिकेला आली उशीरा जाग 

लिका आदेशाची वाट न पाहता विक्रेते व ग्राहकांनी काल (ता.20) व आज (ता.21) शहरातील दोन्ही मंगळवार व बुधवार हे आठवडी बाजार सुरू केल. दोन्ही दिवशी बाजार बंद करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना विक्रेते व ग्राहकांच्यापुढे नमते घ्यावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वीच जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू केले असताना महापालिका प्रशासनाने मात्र आज (ता.21) उशिरा शहरातील दोन्ही आठवडी बाजार सुरू करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. 

संपादन : अरविंद मोटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com