खांबामध्ये अडकलेल्या सापाची केली सुटका : ऍनिमल राहत, डब्लयूसीएफ सदस्यांची कामगिरी 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 19 January 2021

विद्या नगर, शेळगी भागात सहस्रार्जुन प्रशालेतील स्ट्रीट लाईटच्या एका छिद्रामध्ये एक साप अडकला आहे, असे ऍनिमल राहतचे डॉ. अजित मोटे यांनी डब्लयूसीएफच्या कार्यकर्त्याना कळवले. तेव्हा अजय हिरेमठ तिथे जाऊन पाहिले असता धामण जातीचा बिनविषारी साप दिसला. त्या सापाचा तोंडाकडचा भाग बाहेर होता आणि शेपटीकडचा भाग पाईपमध्ये अडकल्याने तो साप तिथे फसल्याचे लक्षात आले. 
 
सोलापूर ः स्ट्रीट लाईटच्या खांबामध्ये अडकलेल्या सापाला डॉक्‍टरांच्या मदतीने जीव वाचवत त्याची सुटका येथील पर्यावरण प्रेमींनी केली आहे. 
विद्या नगर, शेळगी भागात सहस्रार्जुन प्रशालेतील स्ट्रीट लाईटच्या एका छिद्रामध्ये एक साप अडकला आहे, असे ऍनिमल राहतचे डॉ. अजित मोटे यांनी डब्लयूसीएफच्या कार्यकर्त्याना कळवले. तेव्हा अजय हिरेमठ तिथे जाऊन पाहिले असता धामण जातीचा बिनविषारी साप दिसला. त्या सापाचा तोंडाकडचा भाग बाहेर होता आणि शेपटीकडचा भाग पाईपमध्ये अडकल्याने तो साप तिथे फसल्याचे लक्षात आले. 
तेव्हा ऍनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोड यांच्याशी संपर्क केला. तेव्हा डॉ. राकेश चित्तोड यांनी सापाच्या शरीराला लिक्विड पॅराफिन लावून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी त्याला कमी प्रमाणात भूल देण्याचे ठरले आणि भूल दिल्यानंतर त्याचे तोंड एका कापडाद्वारे झाकण्यात आले. त्यांनतर त्या स्ट्रीट पोलला हातोडा आणि छन्नीद्वारे पाठीमागून हाताचे बोट जाण्याइतपत एक छिद्र पाडण्यात आले. त्या छिद्रातून त्या सापाच्या अडकलेल्या भागाला अलगदपणे बाहेर ढकलून सुखरूपपणे त्याची सुटका करण्यात आली. यावेळी बचाव कार्यामध्ये डब्लयूसीएफचे अजित चौहान, भीमाशंकर विजापुरे, पर्यावरणप्रेमी शिवानंद आलुरे, अर्जुन मोहिते यांनी सहभाग घेतला. 

सापाचा पिल्लू निसर्गाच्या सानिध्यात 

सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भावनाऋषी नगर, आकाशवाणी केंद्राजवळील संतोष पंगुडवाले यांच्या घरातील जिन्याच्या फटीमध्ये एक सापाचा पिल्लू वळवळत असल्याचे दिसले. त्या पिलाला पाहून कुटुंबातील सगळेच घाबरले. दरम्यान संतोष यांनी काही सर्पमित्रांना फोन केला. रात्री उशिरा झाल्याने बहुतांश जणांचा संपर्क होउ शकला नाही. अशात एका हॉटेलमध्ये मॅनेंजर असलेल्या रुपेश वीटकर यांना ही माहिती कळली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन त्या सापाच्या पिलाला अलगद पकडले आणि निसर्गाच्या सानिध्यात नेउन सोडले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescue of snake trapped in pole: Animal Rahat, performance of WCF members