मोहोळ तालुक्‍यात पन्नास टक्के महिलाराज ! सदस्यांनी केल्या आरक्षणासंदर्भात तक्रारी 

राजकुमार शहा 
Wednesday, 27 January 2021

ज्या ग्रामपंचायतीच्या आघाडीचे काठावर बहुमत झाले आहे त्यांनी सरपंच पदाचे अंतर्गत नियोजन करून सदस्य मागील आठ दिवसांपूर्वीच सहलीला पाठवले आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे आरक्षण सदस्यांच्या अपेक्षेप्रमाणे निघाल्याने आता आम्हीच सरपंच म्हणून तहसील आवारात मिरवत होते. ज्या ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे व ज्या ठिकाणी आघाडीची सत्ता आहे त्या ठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे.

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी (ता. 28) तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडली. सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीस प्रारंभ झाला. या वेळी तहसीलदार जीवन बनसोडे निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे व नायब तहसीलदार लीना खरात उपस्थित होत्या. आरक्षण सोडती वेळी प्रत्येक सदस्याची नाव नोंदणी करून व सॅनिटायझर करून प्रवेश दिला जात होता. ज्या गावची आरक्षण सोडत मागील वर्षी निवडणुकीत काय झाली आहे, याची यादी सदस्य व ग्रामस्थ घेऊन आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांनी आरक्षणा संदर्भात तक्रारी करण्यास सुरवात केली; मात्र तहसीलदार बनसोडे व नायब तहसीलदार लिंबारे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. ही आरक्षण सोडत 2011 ची जनगणना गृहीत धरून व चक्राकार पद्धतीने काढण्यात आली. यात 50 टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे. 

ज्या ग्रामपंचायतीच्या आघाडीचे काठावर बहुमत झाले आहे त्यांनी सरपंच पदाचे अंतर्गत नियोजन करून सदस्य मागील आठ दिवसांपूर्वीच सहलीला पाठवले आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे आरक्षण सदस्यांच्या अपेक्षेप्रमाणे निघाल्याने आता आम्हीच सरपंच म्हणून तहसील आवारात मिरवत होते. ज्या ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे व ज्या ठिकाणी आघाडीची सत्ता आहे त्या ठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे. सरपंच कोणाला करायचे, हा मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या घोडेबाजाराची शक्‍यता नाकारता येत नाही. या वेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, संजीव खिलारे उपस्थित होते. निरंजन कृष्णा साबळे या लहानग्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. 

गावनिहाय सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे 

  • अनुसूचित जमाती : बोपले 
  • अनुसूचित जाती : मसले चौधरी, मिरी, कुरणवाडी, वडवळ, भांबेवाडी, जामगाव खुर्द 
  • अनुसूचित जाती महिला : शेजबाभूळगाव, दादपूर, यावली, नजीक पिंपरी, हिवरे, वडदेगाव, गलंदवाडी / पासलेवाडी 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : पापरी, देगाव, पीर टाकळी, पोफळी, जामगाव बुद्रूक, अंकोली, सारोळे, बिटले, शिंगोली / तरडगाव, बैरागवाडी, देवडी 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : मोरवंची, वाळूज, आष्टे, कामती खुर्द, खुनेश्वर, ढोक बाभूळगाव, तांबोळे, अनगर, कोंबडवाडी, विरवडे बुद्रूक, वटवटे, तेलंगवाडी, खवणी, पोखरापूर 
  • सर्वसाधारण : मलिकपेठ, लमाण तांडा, पेनूर, येणकी, नरखेड, आष्टी, सोहाळे, हिंगणी, मनगोळी / भैरवाडी, वाफळे, पाटकुल, घाटणे, कोन्हेरी, भोयरे, कोथाळे, विरवडे खुर्द, एकुरके, अर्धनारी, खंडोबाचीवाडी, टाकळी सिकंदर, सय्यद वरवडे, चिखली, कातेवाडी, खंडाळी, सावळेश्वर, रामहिंगणी, कोरवली, नांदगाव, औंढी, वडाचीवाडी, कोळेगाव, यल्लमवाडी, शिरापूरसो, वाघोली / वाघोलीवाडी, चिंचोली काटी, कुरूल, आढेगाव, इंचगाव, नालबंदवाडी, शिरापूर मो, मुंडेवाडी, घोडेश्वर, कुरणवाडी, हराळवाडी, लांबोटी, परमेश्वर-पिंपरी, कामती बुद्रूक, वरकुटे, येवती, अरबळी, सिद्धेवाडी, गोटेवाडी, सौंदणे, अर्जुनसोंड 

एकूण तालुक्‍याचे आरक्षण पाहिले असता अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 13, त्यात 7 महिला व 6 सर्वसाधारण, नागरिकाचा मागास प्रवर्ग 25, त्यात 13 महिला व 12 पुरुष, सर्वसाधारण 55 त्यापैकी 27 महिला व 28 सर्वसाधारण. 

ही आरक्षण सोडत सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक, महेंद्र नवले, तेजस्वी शेरखाने, अक्षय भोसले, योगेश अनंतकवळस यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation of Sarpanch post of Gram Panchayat in Mohol taluka was announced