esakal | लग्नानंतर शिकू दिलं नाही म्हणून तिनं स्वतःला संपवलं
sakal

बोलून बातमी शोधा

Rinku Yertes suicide in Solapur

सासु राणीबाई शिवानंद येरटे (वय 48), पती शंकर शिवानंद येरटे (वय 22, रा. धुम्मा वस्ती लक्ष्मी पेठ, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. मयत रिंकूची आई राजश्री राजू भांडेकर (रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2020 रोजी घडली आहे. राजश्री यांची मुलगी रिंकू हिचे शंकर याच्यासोबत 1 जानेवारी 2020 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर आठ दिवसांनी मुलगी रिंकू माहेरी गेली. मला शाळा शिकायची आहे,

लग्नानंतर शिकू दिलं नाही म्हणून तिनं स्वतःला संपवलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लग्नानंतर रिंकूने शाळा शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण पती आणि सासूने तिला विरोध केला. वेगवेगळ्या कारणावरून तिचा छळ केला. सासरी होणार्‍या छळास कंटाळून रिंकुने आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. 
सासु राणीबाई शिवानंद येरटे (वय 48), पती शंकर शिवानंद येरटे (वय 22, रा. धुम्मा वस्ती लक्ष्मी पेठ, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. मयत रिंकूची आई राजश्री राजू भांडेकर (रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2020 रोजी घडली आहे. राजश्री यांची मुलगी रिंकू हिचे शंकर याच्यासोबत 1 जानेवारी 2020 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर आठ दिवसांनी मुलगी रिंकू माहेरी गेली. मला शाळा शिकायची आहे, परंतु माझ्या पती आणि सासू शाळा शिकू देत नाहीत. मी शाळेत जायचे म्हटले की मला मारहाण करतात. खूप त्रास देतात, असे सांगितले होते. 
याबाबत रिंकूने फोन करूनही आईला कळविले होते. मला घेऊन जा.. असे रिंकूने आईला सांगितले होते. पण सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवले नव्हते. सासरी होणार्‍या छळास कंटाळून रिंकूने दोन फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीला शाळा शिकू दिले नाही, तिला मारहाण केली. माहेरी पाठवले नाही. आरोपींच्या त्रासाला कंटाळून रिंकू हिने पतीच्या घरी आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर मनावर आघात झाल्याने आई राजश्रीने उशीरा फिर्याद दिली आहे. पती आणि सासूवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने तपास करीत आहेत. 

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल 
सोलापूर :
दुचाकीवरून पडून उमा वाकीटोळ (44, रा. केंद्रीय विद्यालयाजवळ, मोदी, सोलापूर) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दुचाकी चालक गोपी वाकीटोळ याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 2 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास मुलतानिया बेकरीसमोर घडली आहे. सनतकुमार व्यंकटेश वाकीटोळ यांनी फिर्याद दिली आहे. तेलंगणा येथे जाण्यासाठी गोपी हा उमा यांना दुचाकीवरून रेल्वे स्थानकाकडे नेत होता. रस्त्यावर कुत्र्यांने भुंकल्याने दुचाकीवरून दोघेही खाली पडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या उमा यांचा 23 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.