संचारबंदीत 18 गावची रस्ते वाहतूक बंद 

police
police
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता 16 जुलै ते 26 जुलैदरम्यान 10 दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 11 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 7 अशा 18 गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. या गावात अत्यावश्‍यक सेवा पुरविण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

ग्रामीण भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 10 दिवस 30 गावात संचारबंदी लागू केली आहे. या काळात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी व गावातील लोक इतर गावात जाऊ नयेत आणि त्या गावात बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

बंद करण्यात आलेल्या गावाचे नाव, गावाला जाणारा बंद झालेला रस्ता आणि पर्यायी रस्ता याप्रमाणे : मार्डी : बंद रस्ता - मार्डी ते कारंबा रस्ता, पर्यायी रस्ता - मार्डी ते अकोलेकाटी फाटा बार्शी रोड, नान्नज : बंद रस्ता नान्नज ते मार्डी, पर्यायी रस्ता - नान्नज ते अकोलेकाटी फाटा बार्शी रोड ते मार्डी, बाणेगाव : बंद रस्ता - बाणेगाव ते कारंबा, पर्यायी रस्ता - बाणेगाव ते भोगाव-सोलापूर रोड, बोरामणी : बंद रस्ता - बोरामणी ते संगदरी, पर्यायी रस्ता - संगदरी ते तांदूळवाडी मार्गे सोलापूर, तिऱ्हे : बंद रस्ता - तिऱ्हे ते पाथरी, पर्यायी रस्ता - पाथरी ते बेलाटी सोलापूर, नान्नज : बंद रस्ता - नान्नज ते बीबीदारफळ, पर्यायी रस्ता - बीबीदारफळ ते अकोलेकाटी - सोलापूर रोड., कोंडी : बंद रस्ता - कोंडी ते गुळवंची, पर्यायी रस्ता - कोंडी ते सोलापूर रोड, बक्षीहिप्परगा : बंद रस्ता - बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा, पर्यायी रस्ता - बक्षीहिप्परगा ते दहिटणे - सोलापूर, पाकणी : बंद रस्ता - पाकणी ते शिवणी, बंद रस्ता - शिवणी ते हिरजमार्गे सोलापूर आणि पाकणी ते सोलापूर, कासेगाव : बंद रस्ता - सोलापूर ते तुळजापूर महामार्गापासून कासेगाव जाणारा रस्ता, पर्यायी रस्ता - कासेगाव ते उळे मुख्य रस्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Vitthal Temple Tightens Rules, Improves Devotee Facilities in Queue
solapur city police
solapur dcc bank
Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated
Marathi News Esakal
www.esakal.com