रस्त्यावरील ट्रॅक्‍टरने केला घात : अपघातात एक ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

  • दुचाकीवरुन मुलांसमवेत जाणारे वडील ठार 
  • बार्शीकडून मुलांसमवेत अविनाश साळुंखे कुर्डूवाडीच्या दिशेने जात होते 
  • रस्त्यावर जॅक लावून उभारलेल्या ट्रॅक्‍टरने केला घात 
  • अल्पवयीन मुलगा जखमी : शासकीय रुग्णालयात उपचार सुरु 

कुर्डुवाडी (सोलापूर) : रस्त्यात उभारलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील वडिल जागीच ठार झाले. अविनाश साळुंखे ( वय 30 , रा कुर्डुवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांचा 12 वर्षीय मुलगा जखमी झाला. 

 

बार्शीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने चालले होते
ही घटना आज रात्री पावणेनऊच्या सुमारास कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील चिंकहिल व चिंचगाव या दरम्यान घडली. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरून अविनाश साळुंखे व त्यांचा मुलगा धनराज साळुंखे (वय- 12) हे दोघेजण बार्शीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने चालले होते. सदर ठिकाणी चाक काढुन जॅक लावून ट्रॅक्‍टर ट्रॉली उभी असल्याचे समजते. या ट्रॉली व दुचाकीच्या अपघातात अविनाश साळुंखे हे जागीच ठार झाले. धनराज यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बालाजी कोळेकर याने अँबुलन्सने दुचाकीवरील दोघांना तत्काळ कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road tractor hit by accident One killed in accident