कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला आता रोबोट; रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा

Robots now to help corona patients
Robots now to help corona patients
Updated on

सोलापूर : सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शिफ्टमध्ये या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे नऊ डॉक्टर त्याठिकाणी आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. रुग्णांना पाणी, फळे, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणण्यासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये आता रोबोट पाहायला मिळणार आहे. 
सोलापुरात आतापर्यंत कोरोनाबाधित 135 रूग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्यातील‌ 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना आरओचे गरम पाणी, अंडी, दूध, चिक्कू, द्राक्ष केळी, सफरचंद देण्याबरोबरच रुग्णांची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांमधील दुवा म्हणून रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापूर रेल्वे विभागातील तील यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा रोबोट बनविला असून उद्यापासून तो सेवेत दाखल होईल, असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक खाजगी हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी, सर्वोपचार रुग्णालय व रेल्वे हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेल्वे हॉस्पिटलला आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना आणखी चांगली सेवा देता येईल, असेही डॉ.
कांबळे म्हणाले.

पाच डॉक्टरांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल पासून सोलापूर शहरातील कोरोना पॉझिटिव्ह 19 रुग्ण उपचार घेत आहेत. आगामी काळात त्यामध्ये वाढ होऊ शकते. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या नऊ डॉक्टर असून आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली आहे.
- डॉ. आनंद कांबळे, रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर

डॉक्टरांना होणार नाही कोरोनाचा संसर्ग
कोरोनाचे वैश्विक संकट देशातून हद्दपार करण्यासाठी रस्त्यांवर तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांनाही या कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांचा वारंवार संपर्क येतो. तर दुसरीकडे डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांचा तुटवडाही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व त्यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करण्यासाठी रोबोट पाहायला मिळणार आहे. या रोबोटमध्ये व्हिडिओ कॅमेरा बसविण्यात आला असून मोबाईलद्वारे त्याला दिलेल्या सूचनांचे पालन तो तंतोतंत करतो की नाही, याची माहिती डॉक्टरांना सहज उपलब्ध होणार आहे. तो रोबोट रुग्णांचा डॉक्टरांशी व्हिडीओ संवादही करून देण्यास मदत करणार आहे. या नव्या प्रयोगामुळे कोरोनाच्या संसर्गापासून डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची निश्चितपणे सुटका होईल, असा विश्वास डॉ. आनंद कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com