सांगोल्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज; ४२ कोटी खात्यावर जमा

Rs 42 crore deposited in bank account of Gharkul beneficiaries in Sangola
Rs 42 crore deposited in bank account of Gharkul beneficiaries in Sangola

सांगोला (सोलापूर) : प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत 2016- 17 ते 2019-20 या कालावधीत सांगोला तालुक्याला चार हजार 720 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी तीन हजार 506 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित एक हजार 214 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. घरकुलांची कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 42 कोटी 07 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2016-17 ते 2019-20 या कालावधीत सांगोला तालुक्यासाठी 3 हजार 781 घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी 2 हजार 732 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर असून सांगोला पंचायत समिती घरकुल योजनेत जिल्ह्यात अग्रेसर राहिला आहे. सन 2016-17 साली 1466, सन 2017-18 साली 732, सन 2018-19 साली 352, सन 2019-20 साली 1232 अशी 3782 इतके घरकुलांचे उद्दिष्ट सांगोला पंचायत समितीला मिळाले होते. 


2016-17 ते 2018-19 मध्ये घरकुल मंजूर केलेल्या 2 हजार 549 लाभार्थ्यांपैकी आजअखेर 2 हजार 301 घरकुलांची काम पूर्ण झाली असून 27 कोटी 61 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. तर 2019-20 मध्ये 1 हजार 232 लाभार्थ्यांना जून 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 191 लाभार्थ्यांना पहिला हप्ता, 915 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता तर 760 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता, 281 लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याचे अनुदान वितरित केले आहे. 2019-20 मध्ये 431 घरकुले पूर्ण झाली असून लाभार्थ्यांना 5 कोटी 17 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान वितरित केले आहे.


रमाई आवास योजनेंतर्गत 2016-17 मध्ये 326, 2017-18 मध्ये 350, 2018-19 मध्ये 263 अशी एकूण 939 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मंजूर घरकुलांपैकी आजअखेर 774 घरकुलांची कामे पूर्ण झाली असून 9 कोटी 28 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. 2019-20 मध्ये सांगोला तालुक्याला 240 घरकुलांना मंजुरी मिळाली असून कामे प्रगतीपथावर आहेत. लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com