गौरी आरास स्पर्धा : रुईकर प्रथम; जिल्ह्यात कुलकर्णी तर तालुक्‍यात उत्पात प्रथम 

श्‍याम जोशी 
Saturday, 5 September 2020

ब्राह्मण महासंघाच्या सोलापूर शहर, जिल्हा व तालुका महिला आघाडीतर्फे स्पर्धेचे संयोजन प्रदेश उपाध्यक्षा नमिता थिटे व प्रदेश संपर्कप्रमुख उमेश काशीकर यांनी केले होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 45 महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी गौरीसमोर वारकरी संप्रदायाची दिंडी, विठू माऊली दर्शन, फुलांची सजावट, इको-फ्रेंडली अष्टविनायक दर्शन तसेच जनजागृतीपर संदेशातून विविध विषय मांडले. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी यंदा ब्राह्मण महासंघाच्या सोलापूर शहर, जिल्हा व तालुका महिला आघाडीच्या वतीने गौरी आरास स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सोलापूर शहरातून अमृता रुईकर, जिल्ह्यातून यावलीच्या स्वाती कुलकर्णी तर तालुक्‍यातून पंढरपूरच्या गौरी उत्पात यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

महिला आघाडीतर्फे स्पर्धेचे संयोजन प्रदेश उपाध्यक्षा नमिता थिटे व प्रदेश संपर्कप्रमुख उमेश काशीकर यांनी केले होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 45 महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी गौरीसमोर वारकरी संप्रदायाची दिंडी, विठू माऊली दर्शन, फुलांची सजावट, इको-फ्रेंडली अष्टविनायक दर्शन तसेच जनजागृतीपर संदेशातून विविध विषय मांडले. सहभागी व विजयी स्पर्धकांचे संस्थापक - अध्यक्ष आनंद दवे, महिला आघाडीच्या तृप्ती तारे, जिल्हाध्यक्षा अनुजा कस्तुरे, शहराध्यक्षा ज्योती हरिदास, व्यवसाय आघाडी जिल्हाध्यक्षा आरती काशीकर, तालुकाध्यक्षा वैशाली देशपांडे, तालुका उपाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. 

विजेत्यांची नावे 
सोलापूर शहर गट ः प्रथम क्रमांक - प्रा. अमृता रुईकर, द्वितीय क्रमांक - मिताली कुलकर्णी, तृतीय क्रमांक - स्वाती जोशी, उत्तेजनार्थ -अनुश्री जोशी 
तालुका गट ः प्रथम क्रमांक - गौरी उत्पात (पंढरपूर), द्वितीय क्रमांक - साधना कुलकर्णी (पंढरपूर), तृतीय क्रमांक - शिवानी कुंभेजकर ( माढा), उत्तेजनार्थ - रूपाली रामदासी (सलगर), दीपाली आराध्ये, अर्चना कुलकर्णी 
सोलापूर जिल्हा गट ः प्रथम क्रमांक - स्वाती कुलकर्णी (यावली), द्वितीय क्रमांक - वृषाली तडकलकर (अक्कलकोट), तृतीय क्रमांक - समृध्दी कुलकर्णी (पोखरापूर), उत्तेजनार्थ - अर्चना सांगवीकर (सोलापूर), प्रांजली हिंगे (सोलापूर), राजश्री दिवाणजी (सोलापूर). 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruikar in the city at the Gauri Aras competition; Kulkarni in the district and Utpat first in the taluka