'सकाळ'चा दणका ! महापालिका प्रशासनाने तीनशे शिक्षकांना केले कोरोना ड्यूटीतून कार्यमुक्‍त

तात्या लांडगे
Monday, 21 September 2020

ठळक बाबी... 

 • को-मॉर्बिड सर्व्हेसह माझे कुटूंब माझी जबाबदारीचेही काम करावे लागेल 
 • आता शक्‍यतो नव्याने नियुक्‍त शिक्षकांना असेल 60 दिवसांची ड्यूटी 
 • शिक्षण विभागाच्या माहितीनुसार महापालिका हद्दीत आहेत तीन हजार 206 शिक्षक 
 • 55 वर्षांवरील शिक्षक- शिक्षिकांना नसेल कोरोना ड्यूटी; गंभीर आजार असलेल्यांनाही वगळले 
 • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने महापालिकेने दिली तीनशे नव्या शिक्षकांना ड्यूटी 
 • आतापर्यंत सुमारे नऊशे शिक्षकांनी केली कोरोना ड्यूटी; रोटेशननुसार करावी लागणार सर्वांना काम

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनांनुसार महापालिकेने शहरातील खासगी प्राथमिक शिक्षण विभागातील, माध्यमिक व मनपा शिक्षण मंडळातील शिक्षकांना कोरोना ड्यूटी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना कार्यमुक्‍त करण्याची कार्यपध्दती निश्‍चित केली. 30 दिवसांच्या ड्यूटीनंतर कार्यमुक्‍त करायचे ठरले, परंतु 40 ते 50 दिवस ड्यूटी होऊनही प्रशासनाने ढिसाळ कारभाराचा नमुना दाखवत ड्यूटीच रद्द केली नाही. त्यावर 'सकाळ'ध्ये वृत्त प्रकाशीत होताच प्रशासनाने सोमवारी (ता. 21) 280 हून अधिक शिक्षकांना कार्यमुक्‍त करीत नव्या शिक्षकांची नियुक्‍ती केली.

ठळक बाबी... 

 • को-मॉर्बिड सर्व्हेसह माझे कुटूंब माझी जबाबदारीचेही काम करावे लागेल 
 • आता शक्‍यतो नव्याने नियुक्‍त शिक्षकांना असेल 60 दिवसांची ड्यूटी 
 • शिक्षण विभागाच्या माहितीनुसार महापालिका हद्दीत आहेत तीन हजार 206 शिक्षक 
 • 55 वर्षांवरील शिक्षक- शिक्षिकांना नसेल कोरोना ड्यूटी; गंभीर आजार असलेल्यांनाही वगळले 
 • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने महापालिकेने दिली तीनशे नव्या शिक्षकांना ड्यूटी 
 • आतापर्यंत सुमारे नऊशे शिक्षकांनी केली कोरोना ड्यूटी; रोटेशननुसार करावी लागणार सर्वांना काम

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वेक्षण, को-मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे करण्यासाठी शिक्षकांना कोरोना ड्यूटी देण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला. त्यानंतर सर्व शिक्षकांना कामाचे समसमान वाटप व्हावे म्हणून नियुक्‍त केलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्‍तीची पध्दत ठरविण्यात आली. त्यानुसार प्रत्येक शिक्षकाला 30 दिवसांची ड्यूटी करणे बंधनकारक केले. तर 30 दिवसानंतर संबंधित शिक्षकाने नव्याने नियुक्‍त केलेल्या शिक्षकास दोन- तीन दिवसांचे प्रशिक्षण द्यावे आणि कार्यमुक्‍तीचे आदेश घ्यावेत, असेही त्या कार्यपध्दतीत नमूद करण्यात आले होते. तत्कालीन उपायुक्‍त पंकज जावळे यांनी सर्व व्यवस्था सुरळीत करीत नियोजन केले. मात्र, त्यानंतर काही शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाने ड्यूटी देण्याचे नियोजन केले. मात्र, 30 दिवसांचा नियम केलाच नव्हता, आता माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमाचे कामही त्या शिक्षकांना करावे लागेल. 30 दिवस नव्हे 60 दिवस ड्यूटी करावी लागेल, अशी उत्तरे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर 'सकाळ'ने पूर्वी ठरलेली कार्यपध्दती आणि शिक्षकांची ओरड व सर्व्हेदरम्यान येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर महापालिकेने दुसऱ्याच दिवशी 30 दिवसांहून अधिक ड्यूटी केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्‍त केल्याचे आदेश काढले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal impact ! solapur Municipal administration relieves 300 teachers from corona duty