सोलापुरात जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरळीत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

दुकानाची वेळ निश्‍चित 
रांगोळीने चौकोन आखले आहेत. त्यानंतर आजपासून बांबूही लावला आहे. त्याच्यापुढे ग्राहकांनी येऊ नये याची खबरदारी घेतली आहे. ग्राहकांनी मास्क घातल्याशिवाय त्यांना दुकानचा माल देत नाही. पोलिसांची गस्त नेहमी सुरू असते. सुरवातीला थोडा त्रास झाला पण आता सर्व सुरळीत सुरू आहे. सकाळी साडेपाच ते दुपारी एक ही किराणा दुकान सुरू ठेवण्याची वेळ निश्‍चित केली आहे. 
- कुमार भिंगारे, मालक, महेश ट्रेडर्स 

सोलापूर ः कोरोनामुळे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्‍य आहे. मात्र, घरात बसून कुणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची किराणा व मेडिकल दुकाने नियमित सुरू ठेवली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात घरात बसून राहणेच नागरिकांनी पसंत केले आहे. मात्र, काही जीवनावश्‍यक वस्तूंची गरज भासल्यास त्याच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले तर त्या वस्तू त्यांना घराच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील सर्व किराणा दुकाने सुरू ठेवली आहेत. दुकाने सुरू ठेवताना दुकानदारांना "सोशल डिस्टन्सिंग' ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे एक-दोन मीटर अंतरावर नागरिकांनी उभे राहावे यासाठी खडूने मार्किंग केले आहे. दोन व्यक्तींमध्ये तेवढे अंतर ठेवूनच दुकानात माल घेण्यासाठी प्रवेश करायचा आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मटनाची दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहर-परिसरातील मटनाची दुकानेही सुरू आहेत. सोलापूर शहरातील अनेक मेडिकल दुकाने सुरू आहेत. मेडिकल दुकाने ही जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने ती सुरू आहेत. मेडिकल दुकानांमध्येही "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जात आहे. मेडिकल दुकानदारांकडून आपल्या दुकानासमोर दोरी लावून तीन फूट अंतरावरूनच संबंधितांना औषध दिली जात आहेत. सोलापूर शहरातील नागरिकांना या सेवा उपलब्ध करून देताना स्वतःची काळजी घेण्यासाठी दुकानदारांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होते. तो संसर्गजन्य रोग आहे. याची जाणीव असल्यामुळे "सोशल डिस्टन्सिंग'ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला मास्क लावण्याची विनंतीही दुकानदार करत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of essential commodities continued in Solapur