
सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील 33 आणि ग्रामीण भागातील 198 असे एकूण 174 जण आज एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आजच्या अहवालानूसार जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या संख्येत 174 नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 134 तर महापालिका हद्दीतील 40 जणांचा समावेश आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण बाधितांची संख्या आता 9 हजार 612 तर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 31 हजार 155 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 40 हजार 767 झाली आहे.
एकूण बाधितांपैकी 37 हजार 142 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या फक्त 2 हजार 168 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 457 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 922 तर महापालिका हद्दीतील 535 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 31 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.