
ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण असून त्यात कुठल्याही प्रकारे बदल अथवा त्यास धक्का लावण्यात येऊ नये. ओबीसी प्रवर्गातील जाती, पोटजातींची व्यक्तिनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन समता परिषदेच्या वतीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना देण्यात आले.
अक्कलकोट (सोलापूर) : ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये व ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी, आदी मागण्याचे निवेदन अक्कलकोट समता परिषदेच्या वतीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना देण्यात आले.
अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक - अध्यक्ष व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट समता परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले, की ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण असून त्यात कुठल्याही प्रकारे बदल अथवा त्यास धक्का लावण्यात येऊ नये. ओबीसी प्रवर्गातील जाती, पोटजातींची व्यक्तिनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अक्कलकोट विधानसभा ओबीसी प्रवर्गातील तेली, माळी, कोष्टी, नाभिक, पोतदार, वीरशैव माळी महासंघ, मुस्लिम ओबीसी या संघटनांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अक्कलकोटच्या नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी समता परिषद तालुका अध्यक्ष काशिनाथ गोळ्ळे, शहराध्यक्ष मुबारक कोरबू, नाभिक समाज अध्यक्ष अरुण विभूते, पोतदार समाज अध्यक्ष स्वामिनाथ पोतदार, तेली समाज अध्यक्ष गणेश अलोळी, माळी महासंघ अध्यक्ष संतोष पराणे, वीरशैव माळी समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील अडवितोटे, दिलीप बिराजदार, भीमा कापसे, शबाब शेख, सरफराज शेख, भागवत विभूते, सुनील इसापुरे, महादेव चुंगी, धर्मराज गुंजले, अहमद शिलेदार, हमीद गिलकी, वेदेश गुरव, विश्वनाथ हडलगी, शिवशरण इचगे, मंगल पाटील, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव आदी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल