पंढरपूर तालुक्यात तीन ठिकाणी वाळू चोरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

लॉकडाऊन असतानाही भिमानदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दरम्यान वाळू उपसा व वाहतूक विरोधी पथकातील पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाऊन असतानाही भिमानदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दरम्यान वाळू उपसा व वाहतूक विरोधी पथकातील पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
आज (ता. 26)  पहाटे चिंचोली भोसे, अजूनसोंड, सुस्ते आणि शेगाव दुमाला येथे पंढरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई करून वाळूसह 11 लाख 12 हजाराचा मुद्दे माल जप्त केला आहे. वाळू चोरी प्रकरणी युवराज तात्या घाडगे (रा. अजूनसोंड), अक्षय अजिनाथ अटकळे, विकास अंकुश अटकळे (रा. शेगाव दुमाला) यांना संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भीमानदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शानाखाली वाळू चोरी विरोधी  पथकाने आज चिंचोली, भोसे, अजूनसोंड, सुस्ते आणि शेगाव दुमाला येथे कारवाई केली. कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर, तीन ट्रॉलीसह सहा ब्रास वाळू जप्त केली आहे. वाळू चोरी विरोधी कारवाईनंतर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand theft at three places in Pandharpur taluka