सांगवीत पोलिस व वाळू चोरात रात्री दोन वाजता थरार 

सूर्यकांत बनकर
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

करकंब पोलिसांनी सांगवी (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा चालू असताना आज (शुक्रवार) रात्री एकच्या सुमारास धाड टाकली. मात्र त्यानंतर तीन ट्रॅक्‍टर आणि तीन आरोपींना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात जात असताना पोलीस आणि वाळू तस्कर यांच्यात झालेल्या थरार नाट्यात एक आरोपी ट्रॅक्‍टरसह पलायन करण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी फिर्याद दिली असून एकूण नऊ जणांविरोधात करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

करकंब (जि. सोलापूर) ः करकंब पोलिसांनी सांगवी (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा चालू असताना आज (शुक्रवार) रात्री एकच्या सुमारास धाड टाकली. मात्र त्यानंतर तीन ट्रॅक्‍टर आणि तीन आरोपींना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात जात असताना पोलीस आणि वाळू तस्कर यांच्यात झालेल्या थरार नाट्यात एक आरोपी ट्रॅक्‍टरसह पलायन करण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी फिर्याद दिली असून एकूण नऊ जणांविरोधात करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगवी येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळल्यावरून पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे रात्री एक वाजता सांगवी येथे पोहचले. तेथे तीन ट्रॅक्‍टरमध्ये अवैध वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांना फोनवरून कल्पना दिली. तातडीने श्री. पाटील आपल्या सहकऱ्यांना घेऊन सांगवी येथे पोहचले. तेव्हा एका ट्रॅक्‍टरचा चालक पळून गेला तर अक्षय शिवाजी भोसले (वय 25, रा. सांगवी) व बंडू मारकड (वय 36, रा. बादलकोट) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण त्यानंतर ट्रॅक्‍टर पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना सांगवी येथील सरपंचाचा मुलगा बापू जालिंदर गलांडे व त्याच्या पाच साथीदारांनी पोलीसांशी हुज्जत घालून ट्रॅक्‍टर चालकास खाली ढकलून दिले. एका ट्रॅक्‍टरमधील अवैध वाळू रस्त्यावरच टाकून अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्‍टरसह पलायन केले. याशिवाय बापू श्रीमंत रोडगे याच्या मुलानेही पोलिसांच्या ताब्यातील ट्रॅक्‍टर जबरदस्तीने घेऊन पलायन केले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेची चोरी करणे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, पोलिसांच्या ताब्यातील माल जबरदस्तीने हिसकावून घेणे, आदी कायद्यानुसार उपरोक्त नऊ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील करत आहेत. 
महाराष्ट्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In sangavi Sand mafia and police clash