सांगोला तालुक्यात आमदारकीचा काळ व पाऊसपाणीवर सोशल मीडियावर टीकाटिप्पणी

Socialmedia
Socialmedia
Updated on

सांगोला (सोलापूर) : सतत पडणाऱ्या पावसामुळे एकीकडे शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे याच पावसाचा संबंध तालुक्यातील आमदारकीच्या काळाशी जोडला जाऊन सोशल मीडियावर याबाबत टीकाटिप्पणी ही सुरू आहे. तालुक्यातील आमदारकीचा काळ व पाऊस-पाणी यावर सांगोला तालुक्यात सध्या सोशल मीडियावरुन जोरदार चर्चा सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सांगोला तालुक्यात गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पाऊस यावर्षी सुरू आहे. या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्ष, बोरे या फळपिकांबरोबरच इतर पिकांचेही नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. परंतु तालुक्यात पडणाऱ्या या पावसाचा संबंध सध्या अनेकजण आमदारकीच्या काळाशी जोडून याबाबत सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड करीत आहेत. 

1995 नंतर सध्या आमदारकीची निवडणूक शहाजी पाटील यांनी जिंकली. याचवर्षी जोरदार पाऊस सुरू असल्याने आमदार शहाजी पाटील यांच्या आमदारकीच्या काळातच निसर्गानेही तालुक्याचा दुष्काळ मोडीत काढला, असे अनेकजण मेसेज फॉरवर्ड करीत आहेत. आमदार शहाजी पाटील यांनी निवडणुकीच्या काळातील भाषणांमध्येही मी आमदार झालो तर तालुक्यात बेडके ओरडायला लावीन (पाण्याच्या सर्व योजना पूर्ण करुन सगळीकडे पाणीच पाणी करीन) असे सतत सांगत असतात.

सध्या सगळीकडे जोरदार पाऊस झाल्याने याचे प्रत्यंतर येत असल्याने याचा संबंध जोडून अनेक जण सोशल मीडियावर याबाबत त्यांच्या भाषणाची ऑडीओ क्लीपबरोबरच बेडकाचे आवाजाचे मेसेज फॉरवर्ड करीत आहेत. शहाजीबापू पाटील आमदार झाले की, तालुक्याचा पाण्‍याचा प्रश्‍न मिटतोच. तो विविध योजना किंवा पाऊस असो याबाबत सध्या मोठी टीकाटिप्पणी फेसबुक, व्हाट्सअप सोशल मीडियावरून सुरू आहे.

दुसरीकडे मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे बापू तुमच्या आमदारकीच्या काळात पाऊस पडत असेल तर तुम्ही राजीनामा द्या. पाऊस कमी होईल, आमचे मोठे नुकसान होत असून तुमच्यामुळे पाऊस पाणी होत असेल तर तुमच्या राजीनाम्यामुळे पाणी जरा कमी होईल व आमची पिके चांगली येतील, अशी उपरोधात्मक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. यामुळे तालुक्यातील आमदारकीचा काळ व पाऊस पाणी यावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आम्हाला ओला, सुका दुष्काळ नको. आम्हाला सुकाळ हवाय 

सध्या सोशल मीडियावरून आमदारकीच्या काळाचा संबंध जोडतच ओला व सुका दुष्काळाबाबत अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. तर काहीजण आम्हाला पूर्वीचा पाणीटंचाईचा दुष्काळ नको आहे. तर सध्याचा ही सतत पडणाऱ्या पावसामुळे ओला ही दुष्काळही नको आहे. आम्हाला सुकाळ हवाय, यामुळे आम्हास दोघांशिवाय तिसराच पर्याय पाहिजे अशी टिप्पणीही होत आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com