सांगोला तालुक्‍याची नजर पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक 

दत्तात्रय खंडागळे
Friday, 2 October 2020

यंदा सांगोला तालुक्‍यात मान्सूनच्या पहिल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षात पडला नाही एवढा पाऊस तालुक्‍यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनके गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सांगोला तालुक्‍याला जबर फटका दिल्याने अंतिम पैसेवारी ही 45 पैसे आली होती. सध्या सांगोला तालुक्‍यात पिकांची स्थिती उत्तम असल्याने चित्र बदलले आहे. यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असला तरी नुकसानीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज वाढला असून आता सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचाः आदर्शने केली प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश वाटपाची मागणी 

यंदा सांगोला तालुक्‍यात मान्सूनच्या पहिल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षात पडला नाही एवढा पाऊस तालुक्‍यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनके गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सांगोला तालुक्‍याला जबर फटका दिल्याने अंतिम पैसेवारी ही 45 पैसे आली होती. सध्या सांगोला तालुक्‍यात पिकांची स्थिती उत्तम असल्याने चित्र बदलले आहे. यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असला तरी नुकसानीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचाः यू ट्युबच्या माध्यमातून मराठीतून दिले गणिताचे धडे 

पावसाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्‍याचा नजर अंदाज हा 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात सुधारित पैसेवारी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सुधारित पैसेवारी बहुतांश वेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात सहसा बदल होत नाहीत. गतवर्षीप्रमाणे ऑक्‍टोबरमध्ये परतीचा पाऊस बरसला नाही म्हणजे झाले अशी भावना शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत. आता 31 ऑक्‍टोबरला सुधारित पैसेवारी तर 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होईल. त्याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणि परतीच्या पावसाची ही धास्ती लागली आहे. 
पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त असली तरी सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. हजारो हेक्‍टर वरील पिके अद्यापही कापणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतांमध्ये पाणी असल्याने पिके काढणीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नजरअंदाज पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त असून यंदा पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola taluka's interest rate is more than fifty paise