हुन्नूर येथून एक हजार 681 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन ! पावणेदोन कोटींचा दंड

Murum
Murum

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील हुन्नूर येथील शिरनांदगी रस्त्यालगतच्या गट क्रमांक सहामधील 1681.4 ब्रास मुरुमाचे अवैधरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी एक कोटी 74 लाख 82 हजार 816 रुपये दंड भरण्याचा आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधितांना दिला आहे. 

सरपंच मनीषा खताळ व त्यांचे पती मच्छिंद्र खताळ, राजाराम पुजारी, जगन्नाथ रेवे यांनी बिरोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांशी संगनमत करून विना परवाना व बेकायदेशीरपणे रस्त्याच्या व इतर कामांसाठी मुरूम विकल्याची तक्रार उपसरपंच प्रवीण साळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान माने, शंकर पुजारी, स्मिता काशीद, रतन क्षीरसागर, सरस्वती चव्हाण, देवराज पुजारी, लक्ष्मण पुजारी, संतोष क्षीरसागर, प्रशांत साळे, संदीप पवार, सुरेश चव्हाण, शशिकांत काशीद, रविराज खडतरे, देकप्पा माने यांनी केली होती. 

शिरनांदगी रस्त्यालगत असलेला गट क्रमांक सहा भोगवटदार वर्ग 2 आहे. सदर जमीन ही पूर्णपणे मुरमाड असून येथील हजारो ब्रास मुरूम कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता सरपंच मनीषा खताळ व त्यांचे पती मच्छिंद्र खताळ यांनी येथील बिरोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त यांच्याशी संगनमत करून परस्पर आर्थिक व्यवहार करून बेकायदेशीरपणे रस्त्याच्या व इतर कामांसाठी विकला. सदर जमीन भोगवटदार वर्ग 2 असल्याने सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हा प्रकार घडत असल्याने याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. 

दरम्यान, सरपंच मनीषा खताळ यांनी या प्रकरणातील आरोप फेटाळत सदरच्या मिळकतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यातील मुरूम विकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, राजकीय द्वेषातून तक्रार केल्याचा खुलासा केला होता. भोसेच्या मंडलाधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार बिरोबा देवस्थानचे वहिवाटदार पुजारी (हुलजंती) यांनी मुरूम उत्खननाबाबत ठराव केला होता. परंतु स्वामित्वधनाची रक्कम जमा केलेली नाही. शासनाने उत्खननाबाबत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 1583 ब्रास मुरूमच्या उत्खननापोटी एक कोटी 64 लाख 63 हजार 616 रुपयाचा दंड आकारावा, असा अहवाल दिला होता. त्यानुसार दंड आकारण्यात आला आहे. 

तसेच ठेकेदार चेतन गाडवे यांनी वर्ग दोनच्या मुरूम उत्खननासाठी तहसील कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे सदरच्या ठिकाणचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांनाही दहा लाख 19 हजार 200 रुपये दंड निश्‍चित करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com