सरपंचांची निवड सदस्यांमधूनच होणार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

bharne mama
bharne mama
Updated on

सोलापूर : सध्या सोशल मीडियावर काही पोस्टचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे जनतेतून होणार असल्याचे या पोस्टमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच होणार कसा? याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सरपंच निवडीबाबत माहिती देताना म्हणाले, सरपंचांची निवड ही सदस्यांमधूनच होणार आहे. 

सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यासाठी कायद्यातही बदल केला आहे. आता तोच निर्णय कायम आहे. येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंचांची निवडही सदस्यांमधून केली जाणार आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या काही पोस्ट मध्ये उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका व या याचिकामध्ये सरकारने माघार घेतल्याने जनतेतून सरपंच निवडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच निवडीबाबत कमालीचा संभ्रम पसरला आहे. हा संभ्रम आता पालकमंत्री भरणे यांच्या विधानामुळे दूर झाला आहे. 

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी कायद्यातही बदला केला. सरपंच निवडीची ही पद्धत गावाच्या विकासाला मारक असल्याने राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली आहे. निवडणूकीला सामोऱ्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच आता सदस्यांमधून निवडण्यात येणार असल्याने आतापासूनच पॅनल निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com