ती दुसऱ्या खोलीत आवरण्यासाठी गेली अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून ही घटना सकाळी दहाच्या दरम्यान घडली. आई घरामध्ये झाडून काढीत होती. मुलगी दुसऱ्या खोलीत स्वतःचे आवरण्यासाठी गेली होती.

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील एका गावात अल्पवयीन मुलगी स्वतःच्या घरामध्ये शाळेला जाण्यासाठी खोलीत तयारी करीत असताना एकाने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 
अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून ही घटना सकाळी दहाच्या दरम्यान घडली. आई घरामध्ये झाडून काढीत होती. मुलगी दुसऱ्या खोलीत स्वतःचे आवरण्यासाठी गेली होती. गावातील संशयित प्रमोद रामा काळे हा मुलीच्या खोलीत घुसला. तिला दमदाटी करून त्याने अत्याचार केला. या वेळी मुलगी मोठ्याने ओरडली. आई खोलीकडे पळत गेली पण त्याने आतून कडी लावली होती. पती व दिराला बोलावून घेतल्यानंतर मुलीने कडी उघडली. अत्याचाऱ्यास जागेवर पकडून ठेवून पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांनी त्यास अटक करून विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिनेश कुंभार तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School girl abused at Barshi