सोलापूर जिल्ह्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी'चा उद्यापासून दुसरा टप्पा 

सोलापूर जिल्ह्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी'चा उद्यापासून  दुसरा टप्पा 
Updated on

सोलापूर : "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून (बुधवार) जिल्ह्यात सर्वत्र सुरु होत आहे. या टप्प्यात नागरिकांची तपासणी करुन त्यांच्या आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये नोंद केली जाईल, याची खात्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. 
"माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीबाबतच्या नियोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठक घेतली. त्याबैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव उपस्थित होते. 
श्री. शंभरकर म्हणाले, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोचून सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बहुतांश नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यातून जिल्हा प्रशासनाकडे माहितीचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र पहिल्या टप्प्यात सर्व्हेक्षण करताना काही आरोग्य पथकांकडून किरकोळ उणिवा राहिल्या आहेत. या उणिवा दुसऱ्या टप्प्यात दूर करण्यासाठी आरोग्य पथकातील आशा सेविका आणि स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. 
चंचल पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवक नियुक्त करताना स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. स्वयंसेवकांना मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये माहिती कशाप्रकारे भरावी याबाबत प्रशिक्षण द्यावे. मोहिमेचा दुसरा टप्पा दहा दिवसांचा असल्यामुळे एका दिवसात एका पथकाकडून किमान 75 घरांचे सर्व्हेक्षण होणे अपेक्षित आहे. घरातील सर्व व्यक्तींची तपासणी होण्यासाठी सर्व्हेक्षण सकाळी लवकर किंवा सायंकाळी करण्याचे नियोजन करावे, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी तपासणी वेळी कोमॉर्बिड रुग्णांची माहिती स्वतंत्रपणे संकलित करावी. सर्व्हेक्षणावेळी कुटुंबातील व्यक्तींबाबत जास्तीत जास्त वस्तुस्थितीदर्शक माहिती नोंदविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शमा पवार-ढोक, हेमंत निकम, दीपक शिंदे, सचिन ढोले, तहसीलदार जयवंत पाटील, डॉ. ज्योती वाघमारे, योगेश खरमाटे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com