esakal | सोलापुरातील महिलांची सुरक्षा रामभरोसे!
sakal

बोलून बातमी शोधा

-

सध्या महिलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. महिला व बालकांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. त्यातूनच एका कंपनीने "दहशतवादी हल्ला', "अपघात', "दरोडा', "महिला सुरक्षा' किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घटनेबाबत पोलिसांची मदत घेण्यासाठी प्रतिसाद ऍप विकसित केले होते.

सोलापुरातील महिलांची सुरक्षा रामभरोसे!

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : सोलापुरातील महिलांची सुरक्षितता सध्या रामभरोसे आहे. प्रत्येकीच्या हातात सध्या स्मार्टफोन आहे. हीच गरज ओळखून सरकारने वेगवेगळे ऍप विकसित केले. त्यातीलच एक म्हणजे "प्रतिसाद आस्क सिटीझन ऍप्लिकेशन.' ऍप सप्टेंबर 2015 ला सुरू केला. त्यानंतर मे 2019 ला हा ऍप अपडेटही करण्यात आला. परंतु सध्या ऍप बंद आहे. मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी येत नाही. याबाबत कंट्रोल पोलिसांच्या रूमला विचारल्यानंतर याची काहीच माहिती नसल्याचे धक्‍कादायक उत्तर दिले जात आहे. या ऍपचा उपयोगच नाही तर मग प्ले स्टोअरमध्ये महाराष्ट्र पोलिस यांचा लोगो असलेले ऍप का ठेवले आहे, असा प्रश्‍न यातून निर्माण होत आहे. 
सध्या महिलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. महिला व बालकांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. त्यातूनच एका कंपनीने "दहशतवादी हल्ला', "अपघात', "दरोडा', "महिला सुरक्षा' किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घटनेबाबत पोलिसांची मदत घेण्यासाठी प्रतिसाद ऍप विकसित केले होते. त्यातून "सोशल इमर्जन्सी'च्या आधारे महाराष्ट्र पोलिसांकडून हे ऍप नि:शुल्क उपलब्ध केले आहे. मदतीसाठी पोलिसांना कॉल करण्यासाठी फक्त ऍप उघडायचे आणि सोशल इमर्जन्सी हे एक बटण दाबावे लागते. 24 एक्‍स 7 दिवस हे ऍप सुरू राहणार असे सांगितले जात होते. नागरिकांना पोलिस खात्याशी अधिकाधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधण्यासाठी या ऍपचा उपयोग होणार आहे. मात्र, या ऍपवरून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

आम्हाला माहीत नाही ः कंट्रोल 
दुपारी 4:17 या वेळेस दूरध्वनी क्रमांक 0217-2744600 या क्रमांकावर प्रतिसाद ऍप ऍक्‍टिव्ह आहे का, या संदर्भात माहिती विचारली असल्यास समोरून उत्तर असे आले की, कोणता ऍप...तो कशासाठी आहे...याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही 0217-2744611 या क्रमांकावर फोन लावून माहिती घ्या, असे सांगण्यात आले. 

त्यानंतर दुपारी 4:27 या वेळेस दूरध्वनी क्रमांक 0217-2744611 या क्रमांकावर फोन लावून प्रतिसाद ऍपची माहिती विचारली असल्यास, समोरून उत्तर असे आले की, विचारून फोन करते म्हणाले परंतु अद्यापही त्यांचा फोन आला नाही. 

मी माझ्या मोबाईलमध्ये प्रतिसाद ऍप डाऊनलोड केले आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओटीपी पाठवला म्हणून मेसेज येतो परंतु ओटीपी आलाच नाही. महाविद्यालयीन युवतींपासून ते महिलावर्गांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेले प्रतिसाद ऍप काहीच कामाचे नाही. 
- सोनाली महिंगडे 

एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी ऍप तयार केले आहे. परंतु हे ऍप बंद असून त्याचा काहीच वापर करता येत नाही. अशावेळी महिला सुरक्षित कशा काय राहू शकतील. असे ऍप बंद असेल तर महिला सुरक्षित कशा राहतील. 
- श्रावणी सलगर

go to top