
सोलापूर : सोलापूर शहरालगत देगाव रोडवरील साठे-पाटील वस्तीजवळ वन्य प्राण्याची कातडी बेवारस अवस्थेत आढळून आली असून प्राणीमित्रांच्या अंदाजानुसार ही कातडी चितळ (स्पॉटेड डीअर) जातीच्या हरणाची असावी, असा कयास आहे. वन विभागाने ही कातडी जप्त केली असून परीक्षणासाठी पाठवली आहे.
रविवारी (ता. 14) संध्याकाळी सहाच्या दरम्यान नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे पप्पू जमादार यांना अतिश म्हेत्रे यांनी देगाव परिसरात चितळ जातीच्या हरिणाची कातडी आढल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. जमादार यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना दिली. घटनास्थळी वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, अकबर शेख, आदित्य घाडगे, इम्रान सगरी यांनी जाऊन पाहणी केली असता कचरा फेकण्याच्या जागी बेवारस अवस्थेत ही कातडी कोणीतरी फेकून दिलेली होती. वनविभागकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कातडी परीक्षणासाठी लॅबला पाठवण्यात येत आहे. अनेकदा इतर प्राण्याच्या कातडीला रंग देऊन हरणाची कातडी म्हणून विक्री केली जाते. नागरिकांनी वन्य प्राण्यांच्या कातडी, हडे शिंगे अथवा मोराची पिसे अशा वस्तू कधीही खरेदी करू नये, असे न झाल्यास शिकारीला आळा बसेल.
- इरशाद शेख, विभागीय वन आधिकारी, वन्य जीव
रविवारी मिळालेल्या माहितीनुसार घटनस्थळी भेट दिली असता बेवारस स्थितीत कातडी आढळली. कातडी बरीच जुनी आहे. पुढील तपासानंतर नेमकी कोणत्या प्राण्यांची आहे, हे समजेल. सध्या तपास सुरू आहे.
-धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.