गामा पैलवानसह सात आरोपींचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज शिंदे, अभिजित ऊर्फ गणेश शिंदे, नीलेश महामुनी, प्रशांत शिंदे, तौसिफ विजपुरे, विनीत खानोरे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

सोलापूर ः कोरोना या विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व हाय पावर कमिटीच्या निर्णयानुसार 45 दिवसांचा अंतरिम जामीन मिळावा म्हणून आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपींनी जामीन अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी जामिनास विरोध केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी आरोपींचा जामीन नाकारला.

आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज शिंदे, अभिजित ऊर्फ गणेश शिंदे, नीलेश महामुनी, प्रशांत शिंदे, तौसिफ विजपुरे, विनीत खानोरे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

दरम्यान, सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांना यापूर्वी खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली आहे. या प्रकरणात सुनावणी सुरू असून नेत्र साक्षीदारांची साक्ष अद्याप झालेली नाही. मृत आबा कांबळे याच्या अंगावर 50 पेक्षा जास्त वार आहेत. आरोपींनी संगमताने कट रचून कांबळेचा खून केला असून आरोपीची ओळख परेड झाली असून पंच साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले आहे, असा युक्तिवाद ऍड. राजपूत यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven accused were denied bail