मुंबईतून चालत आली आणि सोलापुरात....

मुंबईतून चालत आली आणि सोलापुरात....
Updated on

सोलापूर : मुंबईतून चालत चालत सोलापुरात आलेल्या महिलेला तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना तीने गोंधळ घातला...पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने तीला रुग्णवाहिकेत घातले मात्र आकांडतांडव करीत तीने रुग्णवाहिकेतून पळ काढला आणि ती गायब झाली. काल मध्यरात्रीच्या सुमारास बाळीवेस परिसरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. 


लॉकडाऊनमुळे मुंबईहून चालत चालत एक महिला सोलापुरात आली... तीने थेट बाळीवेस परिसरातील आपले घर गाठले...तीला ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याचे 
जाणवल्याने परिसरातील लोकांनी तीला रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिच्या आईनेही तातडीने पोलिसांना कळवले आणि रुग्णवाहिकाही बोलावून घेतली. पण ती काही केल्या रुग्णवाहिकेत बसायला तयार झाली नाही. उलट आलेल्यांना हुसकावून लावण्याचा तीने प्रयत्न केला. पोलिसांच्या अंगावर रिकाम्या बाटल्याही फेकल्या. सातत्याने आकांडतांडव करीत ती परिसरात फिरत होती. मात्र तीला पकडण्याचे धाडस कुणीही करेना. त्यातच पोलिसांबरोबर महिला कॉन्स्टेबल किंवा महापालिकेच्या रुग्णवाहिकेतही कुणी महिला नव्हती, त्यामुळे तीला थेट पकडण्याचे धाडसही कुणी करेना. पोलिसांना बोलावल्याबद्दल ती आपल्या आईला शिव्यांची लाखोली वाहत होती, ओरडत होती. अतिशय संवेदनशील झालेल्या परिस्थितीतही या महिलेला पकडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु झाले. 

या महिलेस ताप व खोकल्याचा त्रास होत असल्याने कोरोनाच्या भीतीने तीला पकडण्यासही कुणी धजावेना. अखेर एकाने धाडस करून तीला रुग्णवाहिकेत बसविले. मात्र ती एकदम जोरात किंचाळली आणि तीने धूम ठोकली. त्यानंतर ती गायब झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही महिला मनोरुग्ण असल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली. रात्री साडेबारापर्यंत हा गोंधळ सुरु होता. स्थानिक नगरसेवक नागेश भोगडे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र बैठकीत असल्याने त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान ही महिला गायब झाल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ती जर कोरोना पॉझिटीव्ह असेल तर तीचा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. आज सकाळी कस्तुरबा मंडईच्या परिसरात ही महिला फिरत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आता ही महिला ज्यावेळी सापडेल त्यावेळीच या प्रभागातील परिस्थिती नियंत्रणात येणार आहे. दरम्यान श्री. भोगडे यांनी परिसरातील सर्व ठिकाणी जंतूनाशक फवारणी करून घेतली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून मी महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्याधिकाऱ्यांना संपर्क साधला. पण बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी मोबाईल बंद केला. त्यामुळे मी जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना संपर्क केला. जिल्हाधिकारीही बैठकीत होते. पोलिस आयुक्तांनी अशा लोकांना ताब्यात घेण्यासाठी शासकीय रुग्णालय किंवा महापालिकेत व्यवस्था आहे, त्या ठिकाणी संपर्क करण्यास सांगितले. ही महिला पॉझीटीव्ह असेल तर काय होईल हा विचारच मनात धडकी भरवून जात आहे. 
- नागेश भोगडे, नगरसेवक 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com