स्वत:ची किडनी देऊन तिने पतीला दिले जीवदान 

Patila Dili Kidhani .jpeg
Patila Dili Kidhani .jpeg

सोलापूर :  जीवनमरणाच्या संकटात सापडलेल्या पतीला स्वतःची किडनी दान देऊन त्यांचा प्राण वाचवण्याची कामगिरी केली आहे सोलापूरच्या प्रणोती कांबळे यांनी. रेल्वे अधिकारी असलेले अरुण कांबळे गेल्या सहा महिन्यापासून दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे सतत आजारी पडत होते. डॉक्‍टरांनी त्यांना तुमची दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. तुम्हाला दुसरी किडनी बसवावी लागेल असे सांगितले. किडनी बदलली तर तुम्ही जगू शकता असेही डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांनी किडनी मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न केले पण त्यांना कुठूनही किडनी मिळाली नाही. हे सर्व पाहून त्यांच्या धर्मपत्नी प्रणोती कांबळे यांनी धाडस दाखवून पतीला स्वतःची किडनी देण्याचा धाडसी निर्णय घेतला व पतीला किडनी देऊन प्रणोती कांबळे यांनी पतीचे प्राण वाचविले. 

या धाडसी महिलेचा जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली कांबळे पती-पत्नी दाम्पत्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन फेटा, शाल, साडी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी देवेंद्र भंडारे म्हणाले, अरुण कांबळे भाग्यवान आहेत. पतीला मृत्यूचा दाढेतून सोडविण्याचे धाडसी काम प्रणोती कांबळे यांनी केले आहे. आपल्या पतीला स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले आहे. समाजात अशा ही महिला आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे. ज्याप्रमाणे सत्यवानाला सावित्रीने मृत्यूचा दाढेतून सोडवण्याचा काम केले होते, आजचा युगातही सावित्री आहे. त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा भगिनीला माझा सलाम असे मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रा.ज्योती वाघमारे, माजी समाज अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, जनरल सेक्रेटरी सिद्राम कामाटी, हणमंतु जंगम, नागनाथ कासलोलकर, राजू अलकोड, हणमंतु सायबोळू, दिनेश म्हेत्रे, बाबु विटे, विठ्ठल मेट्रो, रमेश फुले, मारुती माळगे, मारुती जंगम, शंकर म्यगेरी, मोहन डांगे, सुशिला कांबळे, अंबादास मोतेकर, कृष्णा मुकारे, अरुण येवलेकर, प्रकाश सातलोलु व अंबादास नाटेकर आदी उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com