esakal | पैशाचे अमिष दाखवून विधवा महिलेमार्फत 'तिने' सुरु केला वेश्‍या व्यवसाय ! तळेहिप्परगाजवळील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

बोलून बातमी शोधा

download1-750x403.jpg}

पोलिस निरीक्षक साळुंखे म्हणाले... 

 • पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची लागली त्या महिलेला चिंता 
 • तळेहिप्परगा परिसरातील रेखा गायकवाड हिने त्या महिलेला ज्यादा पैशाचे दाखविले अमिष 
 • दहा- अकरा वर्षांपासून रेखा गायकवाड चालविते स्वत:च्या घरात वैश्‍या व्यवसाय 
 • सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगाव (सोलापूर विद्यापीठासमोर) येथेही ती करत होती वेश्‍या व्यवसाय 
 • गायकवाड या महिलेने घरातच वेश्‍या व्यवसाय सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली; बनावट ग्राहक पाठवून केली खात्री 
 • रविवारी (ता. 7) दुपारी सव्वाएक वाजता मारला छापा; तालुका पोलिस ठाणे आणि अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने सयुंक्‍तपणे केली कारवाई 
 • विधवा महिलेला वेश्‍या व्यवसाय करायला भाग पाडून तिच्या कमाईवर स्वत:ची उपजिविका भागवित होती रेखा गायकवाड 
 • रेखा गायकवाड हिला अटक केली असून पिडीत महिलेची सुटका केली 
solapur
पैशाचे अमिष दाखवून विधवा महिलेमार्फत 'तिने' सुरु केला वेश्‍या व्यवसाय ! तळेहिप्परगाजवळील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : विधवा महिलेमार्फत स्वत:च्या घरातच वेश्‍या व्यवसाय चालविणाऱ्या रेणूका उर्फ रेखा महेश गायकवाड हिला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी आज ताब्यात घेतले. तळेहिप्परगाजवळील मश्रुम गणपती परिसरात त्या महिलेचे घर असून ती विधवा महिलेला पैशाचे अमिष दाखवून तिच्याकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत होती, अशी माहिती तपासांत समोर आल्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले. पोलिसांनी रेखा गायकवाडविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक साळुंखे म्हणाले... 

 • पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची लागली त्या महिलेला चिंता 
 • तळेहिप्परगा परिसरातील रेखा गायकवाड हिने त्या महिलेला ज्यादा पैशाचे दाखविले अमिष 
 • दहा- अकरा वर्षांपासून रेखा गायकवाड चालविते स्वत:च्या घरात वैश्‍या व्यवसाय 
 • सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगाव (सोलापूर विद्यापीठासमोर) येथेही ती करत होती वेश्‍या व्यवसाय 
 • गायकवाड या महिलेने घरातच वेश्‍या व्यवसाय सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली; बनावट ग्राहक पाठवून केली खात्री 
 • रविवारी (ता. 7) दुपारी सव्वाएक वाजता मारला छापा; तालुका पोलिस ठाणे आणि अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने सयुंक्‍तपणे केली कारवाई 
 • विधवा महिलेला वेश्‍या व्यवसाय करायला भाग पाडून तिच्या कमाईवर स्वत:ची उपजिविका भागवित होती रेखा गायकवाड 
 • रेखा गायकवाड हिला अटक केली असून पिडीत महिलेची सुटका केली 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिलेचा पती काही महिन्यांपूर्वी मयत झाला आहे. त्या महिलेला ज्यादा पैशाचे अमिष दाखवून रेखा गायकवाड हिने वेश्‍या व्यवसायात ओढले. मागील दहा- अकरा वर्षांपासून रेखा गायकवाडचा हा व्यवसाय सुरु होता. पोलिसांना रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास रेखा गायकवाड हिने घरातच कुंटणखाना सुरु केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केली. पोलिसांना खात्री झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी पिडीत महिलेसह रेखा गायकवाड पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी तपास केल्यानंतर रेखा गायकवाडकडून सखोल माहिती मिळाली. ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने केली.